शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
3
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
4
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
5
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
6
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
7
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
8
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
9
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
10
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
11
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
12
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
13
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
14
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
15
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
16
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
17
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
18
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
19
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
20
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

आता घरी काय सांगायचे.. ! मग अवघ्या तीनशे रुपयांच्या पेनड्राईव्हपायी त्याने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 10:07 IST

एका मुलीला दिलेला पेन ड्राइव्ह तिने परत न दिल्याने तणावाखाली आलेल्या तरुणाने अवघ्या तीनशे रुपयांच्या पेनड्राईव्हसाठी आपला जीव दिला.

ठळक मुद्देमुलीच्या भावाने भरला होता दमतिने हरवला पेन ड्राईव्हसुसाईड नोट नुसार चौकशी प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: एका मुलीला दिलेला पेन ड्राइव्ह तिने परत न दिल्याने तणावाखाली आलेल्या तरुणाने अवघ्या तीनशे रुपयांच्या पेनड्राईव्हसाठी आपला जीव दिला. सतरा वर्षांच्या राजने (बदललेले नाव) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोट मधील मजकूर आतून समोर आली. याप्रकरणी मृताच्या आई-वडिलांचेही लवकरच बयाण नोंदवले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी दिली. राजने मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळावरून बुधवारी जप्त केली. त्यात इंग्रजी अक्षरांचा वापर करून मराठीतून मजकूर लिहिला होता.सुसाईड नोट मधील मजकूर अनुसार राजने एका मुलीला काही महिन्यांपूर्वी पेन ड्राइव दिला होता. तो पेन ड्राईव्ह त्या मुलीला त्याने परत मागितला. तिने तो पर्यंत दिला नाही. राजुने परत करण्याचा खूप आग्रह धरल्यावर तिने पेन ड्राइव हरवल्याचे त्याला सांगितले. या कारणामुळे राज त्रस्त झाला होता. आता घरी काय सांगावे असा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला होता. त्याने पेन ड्राईव्ह परत करण्याचा हट्ट धरल्यामुळे त्या मुलीच्या भावाने राजूला फोन करून पेन ड्राईव्ह परत मागू नको, परत फोन करू नको आता दमवजा धमकी दिल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आहे. मुलीच्या भावाने आठ वेळा फोन करून पेन ड्राईव्ह मागू नको म्हणून धमकावले.

गळफास देण्याच्या आदल्या दिवशी सुद्धा त्याचा फोन आल्याचा उल्लेख त्या नोटमध्ये आहे. या कारणामुळे राज कमालीचा तणाव ग्रस्त झाला होता. इतर कोणाचाही त्रास नसल्याचे त्याने आपल्या मृत्यूपूर्व पत्रात लिहून ठेवले आहे. मुलीने हरवलेल्या पेन ड्राईव्हमध्ये काही गूढ आहे का या दिशेनेही पोलिस तपास करीत आहेत. पोलिसांना घटनास्थळावर राजस्थान मोबाईल आढळून आला नाही. त्याला आत्महत्येपूर्वी कुणाचे कॉल आले ते शोधण्याकरता पोलीस मोबाईलचा शोध घेत आहेत. आई-वडिलांना विश्वासात घेऊन त्यांचे बयाण नोंदविले जाईल असेही पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी सांगितले.

टॅग्स :Suicideआत्महत्या