शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; भूजल पातळीत दोन मीटरने तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 00:02 IST

यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा ३२.६१ टक्के पाऊस कमी झाल्याचे साइड इफेक्ट आता जाणवायला लागले आहे.

ठळक मुद्देधोक्याची घंटा : अचलपुरात सर्वाधिक ५.६६, चांदूर बाजारात ४.१० मीटरने कमी

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा ३२.६१ टक्के पाऊस कमी झाल्याचे साइड इफेक्ट आता जाणवायला लागले आहे. जिल्ह्यातील १४४ निरीक्षण विहिरींच्या सर्वेक्षणाअंती भूजल सर्वेक्षण विभागाचे निरीक्षण धक्कादायक आहे. पावसाळ्यानंतर सर्वच तालुक्यातील पाच वर्षांची सरासरी भूजल पातळी ५.१० मीटर होती. यंदा मात्र ही पातळी ६.९८ मीटर आढळून आली. म्हणजेच यंदा जिल्ह्यातील भूजल पातळीत १.८६ मीटरची तूट आहे. यामध्ये सर्वाधिक अचलपूर तालुक्यात ५.६६, तर चांदूर बाजार तालुक्यात ४.१० मीटरपर्यंत तूट आढळून आली. आगामी काळासाठी ही धोक्याची घंटाच आहे.जिल्ह्याचा ७५ टक्के भूभाग बसॉल्ट खडकाचा व २५ टक्के पूर्णा नदीच्या गाळाने व्यापला असल्याने सरासरी १० ते १२ मीटरपर्यंतची खोली भूजल पुनर्भरणास योग्य आहे. यंदा जिल्ह्यात ३२.६१ टक्क्यांनी पाऊस कमी झाल्याने अपेक्षित पुनर्भरण झालेले नाही. चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, वरूड, मोर्शी व तिवसा या पाणलोट क्षेत्रात ७५ ते ७८ टक्के पाऊस झाला. उर्वरित लघुपाणलोट क्षेत्रातील (रनआॅफ झोन मधील) निरीक्षण विहिरींच्या पाणीपातळीत मोठी तूट दिसून आली. येथे आगामी काळात पाणीटंचाईचे सावट आहे. या गावांत महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ मधील ८ (१) च्या तरतुदीनुसार पिण्याचे पाण्याचे स्रोत संरक्षित करण्यासाठी कार्यवाही होणे आवश्यक असल्याचा अहवाल भूजल विभागाने जिल्हाधिकाºयांना दिला आहे.चिखलदरा व धारणी तालुक्यात डोंगराळ भागात गावे आहेत. भूस्तर जलग्रहण क्षमता कमी असल्याने येथील भूजल पातळीत झपाट्याने घट होत आहे. वरूड-मोर्शी अतिविकसित पाणलोट क्षेत्रात समाविष्ट असल्याने व बारमाही सिंचन जास्त असल्याने विहिरी व विंधन विहिरीद्वारे भूजलाचा उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. या तालुक्यांतील उपशावर निर्बंध आणावे लागणार असल्याचे विभागाने जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.उन्हाळ्यात १२९ गावांत पाणीटंचाईभूजल पातळीमधील तूट दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्यातील ८४ गावांना आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत, ८० गावांना जानेवारी ते मार्च २०१८ दरम्यान, तर एप्रिल ते जून २०१८ या कालावधीत ११ तालुक्यांमधील १२९ गावांना पाणीटंचाईचे चटके जाणवणार आहेत. उपाययोजनांसाठी आताच नियोजन करावयास हवे.पाणलोट क्षेत्रात नव्या विहिरीस ना!वरूड व मोर्शी तालुका हा अतिविकसित पाणलोट क्षेत्र आहे. या तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या भूजल उपशावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. या पाणलोट क्षेत्रात नवीन विहीर खोदण्यास महाराष्ट्र भूजल (विकास आणि व्यवस्थापन) अधिनियम २००८ मधील आठ (१) तरतुदीनुसार बंदी घालणे आवश्यक असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आलेला आहे.जिल्ह्यात सरासरीच्या ३६ टक्के प्रमाणात पाऊस कमी झाल्यानेच भूजलातील पाण्याची पातळी सरासरी १.८६ मीटरने कमी झाली आहे. रबीचे सिंचन सुरू झाल्यानंतर ही तूट आणखी वाढणार आहे.- विजय खरड, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विभाग