पालकमंत्र्यांची उपस्थिती : पोलीस चौकी, विकासकामांचे लोकार्पणअमरावती : येथील ऐतिहासिक शिवटेकडी (मालटेकडी) वर साकारलेल्या नाना- नानी पार्क, पोलीस चौकी, उद्यान जीम, खुला रंगमंच, अद्ययावत व्यायामशाळा, रेनगन, पॉवर प्रोजेक्ट, वॉल कम्पाऊंड, काटेरी कुंपण, पाणपोई, मातीचा ट्रॅक आणि ११ एलईडी नवीन खांबाचे लोकार्पण पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते सोमवारी पार पडले. शिवटेकडीवर झालेला बदल हा नक्कीच वैभवात भर पाडणारा ठरत आहे.प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला आयोजित शिवटेकडी महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी महापौर चरणजितकौर नंदा या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आ. सुनील देशमुख, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, आ. रवी राणा, आ. यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, बाजार समितीचे सभापती सुनील वऱ्हाडे, उपमहापौर शेख जफर शेख जब्बार, पक्षनेता बबलू शेखावत, विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर, स्थायी समिती सभापती विलास इंगोले, गटनेता अविनाश मार्डीकर, प्रकाश बनसोेड, संजय अग्रवाल, गुंफाबाई मेश्राम, माजी महापौर वंदना कंगाले, माजी खा. अनंत गुढे, वजीर पटेल, सुजाता झाडे, जयश्री मोरे, अल्का सरदार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी केले. यावेळी शिवटेकडीचे वैभव सुरक्षित ठेवण्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्यांचा पालकमंत्री पोटे, महापौर नंदा आदींचा सत्कार करण्यात आला. यात माजी खा. अनंत गुढे, उद्योजक संजय जाधव, मानेहर बारद्धे, गणेश पाटील, यशवंतराव शेरेकर, नानासाहेब राऊत, दिलीप वाकोडे, नारायण उपरकर यांचा पुप्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान, आ. सुनील देशमुख, आ. यशोमती ठाकूर, आ. रवी राणा, महापौर चरणजितकौर नंदा आदींनी मनोगत व्यक्त केले. संचालन नीलिमा काळे, राजेश पाटील यांनी केले.
शिवटेकडीचा चेहरा बदलला
By admin | Updated: January 28, 2016 00:18 IST