शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा चक्काजाम, संभाजी ब्रिगेडचे आक्रमक आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 01:36 IST

नाफेडच्या रांगेत ताटकळणाऱ्या तूर, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा शिवसेनेचा चक्काजाम, संभाजी ब्रिगेडचे आक्रमक आंदोलन करीत शासनदरबारी मांडली. शिवसेनेचे २५ कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतले. संभाजी ब्रिगेडने बबलू देशमुखांचे वाहन रोखले होते.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा प्रश्न : बाजार समितीसमोर तासभर वाहतूक खोळंबली

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : नाफेडच्या रांगेत ताटकळणाऱ्या तूर, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा शिवसेनेचा चक्काजाम, संभाजी ब्रिगेडचे आक्रमक आंदोलन करीत शासनदरबारी मांडली. शिवसेनेचे २५ कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतले. संभाजी ब्रिगेडने बबलू देशमुखांचे वाहन रोखले होते.नाफेडची खरेदी तातडीने सुरू करण्याची मागणी करीत शिवसेनेने शेतकऱ्यांना सोबत घेऊन बाजार समितीसमोर गुरुवारी चक्काजाम केला. शिवसेना तालुकाप्रमुख गोपाल अरबट यांच्या नेतृवात गणेश साखरे, बबनराव विल्लेकर , बालू बायस्कार, रवि कोरडे, जगदीश विल्हेकर, नीलेश मोहोड, विनोद तराळ, गजानन चांदूरकर यांच्यासह शेतकरी यामध्ये सहभागी झाले होते. शासकीय आदेश येईपर्यंत हटणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. यावेळी अकोट, अकोला, अंजनगाव, परतवाडा मार्ग रोखून धरल्याने वाहतूक तब्बल एक तास खोळंबली होती. पोलिसांनी २५ आंदोलकांना ताब्यात घेतले.संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक अभय गावंडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर गुरुवारी रास्ता रोको करण्यात आले. कार्यकर्त्यांनी अचानक तहसीलसमोरील वाहतूक रोखून धरली, तर काहींनी तहसीलदारांच्या दालनात आंदोलन केले. यावेळी लग्न समारंभातून परतणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचे वाहन आंदोलकांनी अडविले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनावर दबाव टाकण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडने केले.यावेळी अभय गावंडे, अरविंद घाटे, नमित हुतके, विकास कुलट, मंगेश बोडखे, महेश डाहेकर, सागर राऊत, वैभव ठाकरे, गणेश कराले, कौस्तुभ पानझाडे, वैभव तिमाने, चंदू वसू आदी सहभागी झाले.

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड