शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवाजी’ची निवडणूक रविवारी; ‘पाटील’ की ‘देशमुख’, बाप्पा कोणाला पावणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2022 13:44 IST

आजीवन सभासदांच्या पाल्यांना नोकरी, कुटुंबातील सभासदाचा मुद्दा गाजणार

अमरावती : येथील श्री. शिवाजी शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक रविवार, दि. ११ सप्टेंबर रोजी होऊ घातली आहे. शिवाजीचा रणसंग्राम गणेशोत्सवाच्या काळात चांगलाच रंगत असून, यंदा ‘पाटील की देशमुख’ कोणाला बाप्पा पावणार, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, यंदाची निवडणूक आजीवन सभासदांच्या पाल्यांना कायमस्वरूपी नोकरी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नव्याने ‘शिवाजी’त सभासदत्वाचा मुद्दा गाजणार आहे. नरेशचंद्र ठाकरे आणि हर्षवर्धन देशमुख यांच्यात काट्याची लढत असल्याचे चित्र आहे.

श्री शिवाजी शिक्षण संस्थेला आतापर्यंत बाबासाहेब घारफळकर, दादासाहेब काळमेघ, रावसाहेब इंगोले, वसंतराव धोत्रे, अरुण शेळके अशा अध्यक्षांचे नेतृत्व लाभले आहे. आता हर्षवर्धन देशमुख यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ नुकताच संपुष्टात आला आहे. मागील निवडणुकीत अरुण शेळकेंच्या विरोधात विविध गटांनी एकत्र येऊन हर्षवर्धन देशमुखांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घातली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत ‘पाटील’ ‘देशमुख’ वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. त्यामुळे मतदार आता कुठला निर्णय घेतात? हे ११ तारखेचा निकाल अवलंबून राहणार आहे.

मागील निवडणुकीत अरुण शेळके आणि हर्षवर्धन देशमुख यांच्यात ७० मतांच्या जवळपास अंतर होते. आता सपकाळ गट प्रामुख्याने ठाकरेंच्या विकास पॅनलसोबत असल्याने त्यांच्याकडे मजबूत पाठिंबा आहे. मात्र यंदा शेळके गटाची भूमिका ‘वेट ॲण्ड वॉच’ असली तरी शेळकेंचा लाभ विकास पॅनेललाच होईल, असे प्रथमदर्शनी दिसून येते. काहीही असले तरी यंदा ‘शिवाजी’ची निवडणूक आजीवन सभासदांच्या पाल्यांना कायमस्वरूपी नोकरी आणि त्यांच्या कुटुंबात नव्याने सभासदत्व बहाल करणे या दोन प्रमुख मुद्द्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे हे दोनही मुद्दे जी व्यक्ती सोडवू शकेल, ज्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता आहे, त्यांच्याच पाठीशी आजीवन सभासद उभे राहतील, हे वास्तव आहे. गत पाच वर्षांचा सत्तापक्षाचा अनुभव आजीवन सभासदांनी घेतला आहे. आता पुढे काय करावे, हे दि. ११ सप्टेंबर रोजी मतपेटीतून ते दाखवून देतील, अशीही चर्चा जोर धरू लागली आहे.

शिवाजी संस्थेत अशी आहे मतदार संख्या

श्री शिवाजी शिक्षण संस्थेत साधारणपणे देशमुख मतदारांची संख्या ८०च्या घरात असून, इतर एकूण १५० मते तर उर्वरित सर्व ४८०च्या वर मते ही पाटलांची आहेत. त्यामुळे संख्याबळ लक्षात घेता, प्रत्येक पॅनलमध्ये पाटील उमेदवारांची संख्याच अधिक असते. यंदाची निवडणूक पहिल्यांदाच आजीवन सभासदांच्या पाल्यांना नोकरी आणि त्यांच्या कुटुंबातील नव्याने सभासदत्व यावर ‘फोकस’ झाली आहे. त्यामुळे बाजी कोण मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणHarshvardhan Deshmukhहर्षवर्धन देशमुखAmravatiअमरावती