शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठात शिवाजी महाराज ‘मॅनेजमेंट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 20:37 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात 'छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा आणि व्यवस्थापन' विषयाचा दोन वर्षांचा स्नातकोत्तर अभ्यासक्रम (पी.जी. कोर्स) सुरू करण्यास व्यवस्थापन परिषदेने तत्वत: मान्यता दिली आहे.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात 'छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा आणि व्यवस्थापन' विषयाचा दोन वर्षांचा स्नातकोत्तर अभ्यासक्रम (पी.जी. कोर्स) सुरू करण्यास व्यवस्थापन परिषदेने तत्वत: मान्यता दिली आहे. मात्र, हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा, असा निर्णयदेखील घेण्यात आला आहे. विद्यापीठात फेब्रवारीत व्यवस्थापन परिषदेची सभा घेण्यात आली. अर्थसंकल्पाविषयी पार पडलेल्या या सभेत महत्त्वाचे प्रश्न, प्रस्तावावरही लक्ष वेधण्यात आले. यावेळी राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिनेश सूर्यवंशी यांनी प्रस्ताव क्रमांक १५९ अन्वये शिवाजी महाराज ‘मॅनेजमेंट’ हा अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी सामाजिक संघटनांची आहे. मात्र, उच्च व तंत्र शिक्षण विभागाने नवीन खर्चाविषयीचे कोणतेही प्रस्ताव किंवा मागणी करू नये, असे विद्यापीठाला कळविले आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, पराक्रम हे नव्या पिढीला कळावेत. किल्ल्यांचे महत्व, त्यांचे शूरकार्य अभ्यासक्रमात शिकविणे ही काळाची गरज असल्याचे दिनेश सूर्यवंशी म्हणाले. निधी नाही म्हणून अभ्यासक्रम सुरू न होणे हे संयुक्तीक नाही. शिवाजी महाराज ‘मॅनेजमेंट’ अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विद्यापीठाने सामाजिक संघटना, दानशूर व्यक्तींना आवाहन करून निधी उभारावा, असे सूर्यवंशी म्हणाले. त्यामुळे शिवसेनेचे उपशहरप्रमुख अमोल निस्ताने यांच्या मागणीनुसार शिवाजी महाराज यांची विचारधारा व व्यवस्थापन या विषयाच्या दोन वर्षांच्या स्नातकोत्तर अभ्यासक्रम किंवा अल्पकालीन अभ्यासक्रम, ऐच्छिक अथवा पदव्युत्तर स्तरावर सुरू करण्यास व्यवस्थापन परिषदेने तत्वत: मान्यता प्रदान केली आहे. तथापि, यासंदर्भात समग्र विचारविनिमय करून शिफारस करण्याच्या दृष्टीने सदर बाब अधिष्ठाता मंडळाकडे पाठविण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे.

‘‘ शिवाजी महाराज मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी व्यवस्थापन परिषदेने मान्यता प्रदान केली आहे. मात्र, निधीबाबत तरतूद नाही. यासंदर्भात येत्या सिनेटमध्ये याविषयी चर्चा होऊन काहीतरी निर्णय लागण्याची शक्यता आहे.    - हेमंत देशमुख    संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ

टॅग्स :Amravatiअमरावती