शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठात शिवाजी महाराज विचारधारा, महात्मा फुले अध्यासन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 13:04 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात नव्याने छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन या विषयाचा दोन वर्षांचा स्नातकोत्तर अभ्यासक्रमाची (पीजी) मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे.

ठळक मुद्देव्यवस्थापन परिषदेत होणार निर्णयकुलगुरुंच्या अधिकारात खर्चाचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात नव्याने छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन या विषयाचा दोन वर्षांचा स्नातकोत्तर अभ्यासक्रमाची (पीजी) मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्राची स्थापना केली जाणार असून, १३ डिसेंबर रोजी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या दोन्ही विषयांवर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत आहेत.कुलगरू मुरलीधर चांदेकर यांच्याकडे समाजाच्या विविध घटकांमधून आलेल्या मागणीनुसार प्रशासनाने राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने त्याकरिता पाठपुरावा केला. शासनावर खर्चाचा भार पडणार नाही, असा कोणताही प्रस्ताव पाठवू नये, उच्च व तंत्र शिक्षण विभागाने विद्यापीठाला कळविले आहे. मात्र, समाजाभिमुख निर्णय घ्यायचे असल्यास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीेठ अधिनियम २०१६ मधील तरतुदीनुसार, व्यवस्थापन परिषदेला त्याअनुषंगाने निर्णय घेता येतो. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन या विषयाचा दोन वर्षांचा स्नातकोत्तर अभ्यासक्रम आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्राच्या स्थापनेस मान्यता प्रदान करण्यासाठी हा विषय व्यवस्थापन परिषदेकडे पाठविला आहे. या दोन्ही नव्या उपक्रमासाठी लागणारा खर्च कुलगुरुंच्या अधिकारातील खर्चामधून केला जाणार आहे. शासनाकडे कोणत्याही प्रकारच्या खर्चाचा भार विद्यापीठाने दिला नाही. शिक्षण संचालकांच्या आदेशाप्रमाणे हे दोन्ही उपक्रम सुरू करण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे. पदे व निधी शासन देणार नाही, हे स्पष्ट असल्याने विद्यापीठ प्रशासनाने स्थानिक पातळीवर नियोजन केले आहे. शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन अभ्यासक्रमाची मागणी शिवसेनेचे उपशहरप्रमुख अमोल निस्ताने, तर क्रांतीज्योती सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्राची स्थापना करण्याची मागणी उपेक्षित समाज महासंघाने केली होती. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने वाटचाल चालविली आहे.

‘‘ समाजातून आलेल्या मागणीचा विचार करूनच महापुरुषांच्या विचारधारेचे अभ्यासक्रम, अध्यासन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने प्रशासन कार्यवाही करेल.- मुरलीधर चांदेकर,कुलगुरु, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र