अमरावती : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासूनच दरवर्षी तिथीनुसार साजरी करण्यात येते. त्यानुसार सदर कार्यक्रमाचे आयोेजन मनसेचे महानगर अध्यक्ष संतोष बद्रे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
महानगरातील बडनेरा, नवाथे येथील शिवरायांच्या पुतळ्यांचे पूजन व अंबादेवी मंदिराच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचा राज्यभिषेक करण्यात आला. याप्रसंगी गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन मनसे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील, उद्योजक नितीन कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी शहराध्यक्ष गौरव बांते,शहर संघटक प्रवीण डांगे, पश्चिम पश्चिम विदर्भ विद्यापीठ अध्यक्ष भूषण फरतोडे, महिला सेना जिल्हाध्यक्ष रिना जुनघरे, कामगार सेना जिल्हा चिटणीस विक्की थेटे, वाहतूक सेना जिल्हा संघटक रावेल गिरी, शहरप्रमुख पवन राठी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष धीरज तायडे, मनविसे शहर अध्यक्ष हर्षल ठाकरे, उपाध्यक्ष नितेश शर्मा, सचिन बावणेर, अजय महल्ले, शुभम वानखडे, मनविसे शहर उपाध्यक्ष मयंक तांबुस्कर, शहर सचिव राजेंद्र देवडा, आदेश इंगळे, पवन लेंडे, गौरव बेलूरकर, ऋतुज डायलकार, हरीश तुमरे, ऋषी पाटील, ज्ञानेश्वर लांडे, श्रीकांत थोरात, कुणाल चोपडे, शहर सचिव योगेश मानेकर, निखिल बीजवे, बबलू आठवले, विभाग अध्यक्ष मनीष दीक्षित, शैलेश सूर्यवंशी, सूरज बरडे, शशिकांत खरबडे आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.