शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मेंढपाळ-वनकर्मचाऱ्यांत संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 22:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : पूर्व मेळघाट वनविभाग चिखलदरा अंतर्गत येणाऱ्या अंजनगाव वनपरिक्षेत्रातील चिंचोना बीटमध्ये अनेक दिवसांपासून बस्तान मांडलेल्या अतिक्रमणधारक १९ मेंढपाळांवर वनविभाग व पोलीस यांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी दुपारी कारवाई केली. यात मेंढपाळ आणि वनविभागात संघर्ष उडाला. मात्र, पोलीस व वनकर्मचाऱ्यांचा ताफा प्रचंड होता. जंगलात घुसखोरी व अतिक्रमण केल्याचा गुन्हा दाखल ...

ठळक मुद्देपूर्व मेळघाटातील अतिक्रमण काढले : वन अधिनियमानुसार गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : पूर्व मेळघाट वनविभाग चिखलदरा अंतर्गत येणाऱ्या अंजनगाव वनपरिक्षेत्रातील चिंचोना बीटमध्ये अनेक दिवसांपासून बस्तान मांडलेल्या अतिक्रमणधारक १९ मेंढपाळांवर वनविभाग व पोलीस यांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी दुपारी कारवाई केली. यात मेंढपाळ आणि वनविभागात संघर्ष उडाला. मात्र, पोलीस व वनकर्मचाऱ्यांचा ताफा प्रचंड होता. जंगलात घुसखोरी व अतिक्रमण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.पूर्व मेळघाट वनविभाग चिखलदरा अंतर्गत अंजनगाव वनपरिक्षेत्रातील चिंचोना बीट क्रमांक ८० व ८१ मध्ये मोठ्या प्रमाणात मेंढपाळांनी अतिक्रमण केल्याची तक्रार वनविभागाकडे करण्यात आली होती. त्यावरून मंगळवारी वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी, पोलीस कर्मचारी आदींनी मेंढपाळांनी अतिक्रमण केलेल्या जंगलातील जागेवरील तारेचे कुंपण हटविले. सदर कारवाई करीत असताना मेंढपाळांनी विरोध केला. मात्र, वन विभाग आणि पोलिसांच्या प्रचंड ताफ्याने विरोध मोडून एकूण १९ मेंढपाळांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम (२६) (ड) (एच) (१-ए) (ए) अन्वये गंभीर कारवाई करण्यात आली आहे. कारवाईमध्ये अंजनगावचे नायब तहसीलदार मंगेश सोळंके, ठाणेदार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र डंबाले तसेच पूर्व मेळघाट वनविभागाचे उपवनसंरक्षक अविनाश कुमार, विभागीय दक्षता अधिकारी एच.एस. वाघमोडे, सहायक वनसंरक्षक अशोक राम पऱ्हाड, वनपरिक्षेत्र अधिकारी ओमप्रकाश पेंदोर यांच्या मार्गदर्शनात एटीपीएफ अकोटच्या महिला वनकर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले. वनविभागाच्या जंगलात अतिक्रमण दिसल्यास माहिती देण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.अंजनगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चिंचोना बीटमध्ये अतिक्रमण करणाºया १९ मेंढपाळांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.- अविनाश कुमार, उपवनसंरक्षक, पूर्व मेळघाट वनविभाग, चिखलदरा