शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शेंदूरजनाघाट ‘टॉप टेन’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 22:56 IST

स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ अंतर्गत स्वच्छता अ‍ॅपच्या सदुपयोगावर आधारित डायनॅमिक रँकिंगमध्ये शेंदूरजनाघाट नगर पालिका टॉप टेनमध्ये आली आहे. विशेष म्हणजे, देशभरातील चार हजारांपेक्षा अधिक महापालिका, नगर पालिका व नगर पंचायतींचा समावेश असलेल्या या रॅकिंगमध्ये शेंदूरजनाघाट पालिका सहाव्या क्रमांकावर असल्याने स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये शहराचे गुणांकन उत्तम राहण्याचे संकेत आहेत.

ठळक मुद्देडायनॅमिक रँकिंग : स्वच्छ सर्वेक्षण-२०१९

जयप्रकाश भोंडेकर।लोकमत न्यूज नेटवर्कशेंदूरजनाघाट : स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ अंतर्गत स्वच्छता अ‍ॅपच्या सदुपयोगावर आधारित डायनॅमिक रँकिंगमध्ये शेंदूरजनाघाट नगर पालिका टॉप टेनमध्ये आली आहे. विशेष म्हणजे, देशभरातील चार हजारांपेक्षा अधिक महापालिका, नगर पालिका व नगर पंचायतींचा समावेश असलेल्या या रॅकिंगमध्ये शेंदूरजनाघाट पालिका सहाव्या क्रमांकावर असल्याने स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये शहराचे गुणांकन उत्तम राहण्याचे संकेत आहेत.देशभरातील स्वच्छ शहरांचे गुणांकन करण्यासाठी सलग चौथ्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षण केंद्राने हाती घेतले आहे. पाच हजार गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणाची तपासणी ४ जानेवारीपासून सुरू झाली. स्वच्छता अ‍ॅपच्या वापरासाठी सुमारे ४०० गुण आहेत.स्वच्छता अ‍ॅप किती नागरिकांनी डाऊनलोड केलेत, वापरकर्त्यांचा सहभाग, संबंधित नागरी स्वराज्य संस्थेचे जबाबदारी व वापरकर्त्याचा अभिप्राय या चार घटकांवर स्वच्छ सर्वेक्षणादरम्यान ४००० शहरांचे डायनॅमिक रॅकिंग ठरविण्यात येते. ११ आॅगस्ट २०१८ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत संबंधित शहरांनी किती संख्येत स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करून त्यावर अस्वच्छतेविषयक तक्रारी केले, संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने त्या तक्रारींची किती कालावधीत सोडवणूक केली व त्यानंतर संबंधित तक्रारकर्ता वा वापरकर्त्याने तक्रार व सोडवणुकीबाबत कसा अभिप्राय दिला, या चार घटकांवर ४०० गुणांची मदार आहे.शेंदूरजनाघाट नगरपालिका चार हजार शहरांच्या तुलनेत या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षणात शेंदूरजनाघाट पालिका नागरिकांचा प्रतिसाद या घटकात दुसरा क्रमांक पटकाविला होता. स्वच्छता अ‍ॅपच्या डायनॅमिक रॅकिंगमध्ये पहिल्या सहामध्ये आल्याने स्वच्छ सर्वेक्षणात शेंदूरजनाघाट पालिकेचे ४०० पैकी किमान ३५० गुण निश्चित झाले आहेत.उद्दिष्टापेक्षा अधिक स्वच्छता अ‍ॅपस्वच्छ सर्वेक्षणात सहभागी प्रत्येक नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या एकूण लोकसंख्येच्या दोन टक्के स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करणे बंधनकारक होते. शेंदूरजनाघाट पालिकेने उद्दिष्टपूर्तीच्या १०८७ च्या तुलनेत १११३ स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करवून घेऊन १०० टक्के गुण मिळविले आहेत.