शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

कुटुंब गमावल्याचे दु:ख घेऊन ‘ती’ न्यायाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 22:28 IST

लग्नानंतर माहेरची माणसे दुरावली, तर सासरी असूयेपोटी भीषण परिस्थिती ओढवली. वडिलांचे घरही इतरांनी ताब्यात घेतले.

ठळक मुद्देअमरावतीत माहेर : सुखवस्तू कुटुंबातील, तरीही रेल्वे स्टेशनच्या आडोशाला आश्रय

इंदल चव्हाण ।आॅनलाईन लोकमतअमरावती : लग्नानंतर माहेरची माणसे दुरावली, तर सासरी असूयेपोटी भीषण परिस्थिती ओढवली. वडिलांचे घरही इतरांनी ताब्यात घेतले. त्यामुळे माहेरी आल्यावर रेल्वे स्थानकाच्या प्रांगणात आश्रय घेण्याची वेळ एका वृद्धेवर येऊन ठेपली आहे. आपले प्रकरण न्यायदरबारी मांडण्यासाठी सुहृद व्यक्तीने पुढे यावे, अशी तिची अपेक्षा आहे.सदर वृद्धा आपले नाव आशाबाई भवलाल बडगुजर असल्याचे सांगते. तिचे अंदाजे वय ५५ वर्षांच्या आरपास आहे. तिच्या म्हणण्यानुसार, शहरातील रेल्वे स्टेशन ते इर्विन चौक मार्गातील काही घरे ही तिच्या भावांच्या मालकीची होती. प्रभाकर सदावर्ते, दिवाकर सदावर्ते, नारायण पहिलवान अशी नावे तिच्या बोलण्यातून पुढे आली. ते कंत्राटदार होते आणि सुखवस्तू होते. या कुटुंबातील ती एकमेव वारस असल्याचे वृद्धेने सांगितले.दरम्यान, आशाबाईचे लग्न खंडवा येथे झाले. तेथेही बडगुजर कुटुंब सुखवस्तू होते. त्यांना दोन मुले व दोन मुलगी होत्या. मात्र, पतीचे हृदयविकाराने निधन झाले. दोन्ही मुलं नोकरी मिळविण्याच्या बेतात पैसे घेऊन घराबाहेर पडले नि त्यांचा अपघात होऊन ते दगावले. संपत्तीच्या हव्यासापोटी गावातील काही व्यक्तींनी लुटमारीचा बनाव करीत राखीला आलेली मुलगी व तिच्या मुलांचा खून घडवून आणला. हे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. यानंतर काही वर्षे परागंदा राहिलेल्या आशाबार्इंनी अमरावती शहर गाठले.दरम्यानच्या काळात भावांची जुनी घरेही इतरांनी बळकावली होती. त्यामुळे आपली व्यथा मांडत त्यांनी या घरापुढील अमरावती रेल्वे स्थानक गाठले आणि तेथे १५ दिवसांपासून बस्तान मांडले. माहेर दुरावलेले, पती-मुलांचा वियोग आणि विचित्र दैवयोगाने झालेली विपरीत परिस्थिती याचा ताण पडल्याचे त्यांच्या स्थितीवरून जाणवते. तरीही आपली व्यथा कायद्याचे ज्ञान व सामाजिक भान असलेला कुणी तरी ऐकेल व न्याय मिळवून देईल, अशी आशा त्यांना आहे. ही भाबडी आशा ठरू नये, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली.रस्त्यावरचे जिणे अन् अनंत वेदनाआशाबार्इंना परिस्थितीने रस्त्यावरचे जिणे आणले आहे. गेल्या १५ दिवसांपासून अमरावती रेल्वे स्थानकावर ती या अवस्थेत आढळून येत आहे. या काळात अमरावती येथील एकाही नातेवाईकाने त्यांच्याशी संपर्क करण्याची वा त्यांची विचारपूस करण्याची तसदी घेतली नाही.