शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

चांदूरबाजार तालुक्यात शतकोटी वृक्ष लागवड योजनेचा बट्ट्याबोळ

By admin | Updated: June 19, 2015 00:41 IST

शतकोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत लावण्यात आलेली झाडे आता माना खाली टाकू लागले आहेत.

चांदूरबाजार : शतकोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत लावण्यात आलेली झाडे आता माना खाली टाकू लागले आहेत. या वृक्षांना आता जीवनदान देण्यासाठी पाण्याची गरज आहे. अन्यथा लावण्यात आलेली झाडे वाळून शासनाचे कोट्यवधी रुपयांचे खर्च व्यर्थ जाणार. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने शतकोटी वृक्ष लागवड योजना अमलात आणली. या योजनेसाठी राज्यात अभियान राबविण्यात आले. या योजने अंतर्गत प्रत्येक गावात शासकीय कार्यालय, शाळा महाविद्यालयांत अधिकाधिक झाडे लावण्यासाठी जागृती करण्यात आली. प्रत्येक ग्रामपंचायतीला निश्चित उद्दिष्ट्य देण्यात आले. तसेच ध्येयपूर्तीसाठी व झाडे लावण्यासाठी अनुदान दिले गेले. झाडे लावण्यासाठी खड्डे खोदण्यापासून झाडे लावणे, झाडांना काटेरी कुंपण लावणे, पाणी टाकणे व देखभालीसाठी अनुदान स्वरुपात खर्च देण्यात आला. योजना अतिशय चांगली असतानां सुरुवातीलाच या योजनेला तालुक्यात काही मोजक्या गावात प्रतिसाद मिळाला तर ७० ते ८० टक्के ही योजना बोगसरित्या कागदोपत्री राबविण्याचे दाखविले.शतकोटी वृक्ष लागवड योजने अंतर्गत तालुक्यात ३० ते ४० टक्के पर्यंत राबविण्यात आलेल्या योजना अंतर्गत लावण्यात आलेल्या अनेक झाडांनी आता माना खाली टाकल्या आहे. या झाडांना जीवनदान मिळण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज आहे. पाण्याअभावी लावलेली झाडे वाळू लागली आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा झाडे ही चांगली मोठी आहेत. मोठी झालेली झाडे भर उन्हाळ्यात आतापर्यंत तग धरुन आहेत. परंतु आता मात्र या झाडांना पाण्याची सक्त आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत संबंधित विभागाने व शासनाने याकडे लक्ष देऊन कमी अधिक प्रमाणात पाणीपुरवठा करावा व झाडांना जीवनदान द्यावे, अन्यथा कोट्यवधी रुपये खर्च करुन शतकोटी योजनेअंतर्गत काही प्रमाणात जिवंत असणारी झाडे मात्र आता दमतोडत असल्याने शासनाच्या कोट्यवधींचा खर्च हा व्यर्थ जाणार, हे निश्चित. दुसरीकडे मात्र ज्या उद्देशाने शासनाने ही योजना अमलात आणली तो उद्देश फोल ठरणार आहे. तालुक्यात कागदोपत्रीच योजना राबवून फक्त शासनाला चुना लावण्याचे काम सर्वांनी केले आहे.(तालुका प्रतिनिधी)