शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
4
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
5
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
6
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
7
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
8
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
9
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
10
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
11
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
12
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
13
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
14
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
15
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
16
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
17
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
18
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
19
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
20
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित

शरद पवारांचा नागरी सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 22:45 IST

विधिमंडळ आणि संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांचा नागरी सत्कार सोहळा सोमवारी पार पडला. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.

ठळक मुद्देअलोट गर्दी : मुख्यमंत्र्यांनी मांडला राजकीय प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विधिमंडळ आणि संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांचा नागरी सत्कार सोहळा सोमवारी पार पडला. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली खा. पवारांंचा नागरी सत्कार सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, महापौर संजय नरवणे, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, खा. आनंदराव अडसूळ, आ. सुनील देशमुख, आ. वीरेंद्र जगताप, आ. यशोमती ठाकूर, आ. रवि राणा, आ. अनिल बोंडे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, रिपाइं नेत्या कमलताई गवई, देवीसिंह शेखावत, प्रभाकरराव वैद्य, माजी मंत्री वसुधा देशमुख, अनिल देशमुख, सुभाष ठाकरे, अरुण गुजराथी, मनोहर नाईक, गुलाबराव गावंडे, रमेश बंग, तुकाराम बिरकड, माजी आमदार सुलभा खोडके, आ. प्रकाश गजभिये, भाजप नेत्या निवेदिता चौधरी, संदीप बाजोरिया, माजी खासदार अनंत गुढे, शरद तसरे, राजेंद्र गवई, सुनील वºहाडे, महापालिका आयुक्त हेमंत पवार, किशोर बोरकर, बाबा राठोड, उपमहापौर संध्या टिकले, माधुरी चेंडके, सुरेश देशमुख, भाजपचे शहराध्यक्ष जयंत डेहनकर, विलास इंगोले, बबलू शेखावत, प्रकाश साबळे आदी उपस्थित होते. यावेळी आयोजन समितीतर्फे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शरद पवारांना मानपत्र, सन्मानचिन्ह व शाल-श्रीफळ देऊन नागरी सत्कार करण्यात आला.श्री शिवाजी शिक्षण संस्था, आमदारांच्यावतीनेसुद्धा पवारांचा भला मोठा हार घालून सत्कार केला. मानपत्राचे वाचन विजया डबीर यांनी केले. पालकमंत्री प्रवीण पोटे, खा. आनंदराव अडसूळ, रिपाइंचे नेते राजेंद्र गवई, माजी मंत्री वसुधा देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षीय भाषणातून शरद पवारांच्या ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख मांडला. पवारांनी मुख्यमंत्री, कृषीमंत्री, संरक्षणमंत्री अशी पदे भूषवित असताना क्रीडा, राजकारण, समाजकारणात आजपर्यंत केलेला प्रवास राज्याच्या इतिहासात स्मरण राहील, असे ते म्हणाले. राष्ट्रगीताने नागरी सत्कार सोहळ्याचा समारोप झाला. जिल्हाभरातून पवारांचे चाहते, जुने जाणते कार्यकर्त्यांनी अलोट गर्दी केली होती.