शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शंकरबाबांची मूकबधिर लक्ष्मी झाली मध्यप्रदेशची स्नुषा

By admin | Updated: March 22, 2017 00:08 IST

पाहुण्यांची वर्दळ... सनई-चौघड्यांचे पवित्र स्वर.. अशा मंगलमय वातावरणात शंकरबाबांची १८ वी मानसकन्या मूकबधिर लक्ष्मी रिती-रिवाजानुसार मध्यप्रदेशच्या बैतूल जिल्ह्याची सून झाली.

१८ व्या कन्येचे दान : वझ्झरमध्ये आनंदोत्सव, बैतुल येथील सामूहिक विवाह सोहळ्यात बांधल्या गाठी परतवाडा : पाहुण्यांची वर्दळ... सनई-चौघड्यांचे पवित्र स्वर.. अशा मंगलमय वातावरणात शंकरबाबांची १८ वी मानसकन्या मूकबधिर लक्ष्मी रिती-रिवाजानुसार मध्यप्रदेशच्या बैतूल जिल्ह्याची सून झाली. लक्ष्मीच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने वझ्झरच्या बालगृहात आनंदोत्सव साजरा झाला. हा विवाह सोहळा मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यात पार पडला अन् शंकरबाबांसह लक्ष्मीच्या भावंडांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले.देशभरातील बेवारस, अनाथ, अपंग, मतिमंद मुला-मुलींचे पालकत्व स्वीकारलेले वझ्झर येथील बालगृहाचे संचालक शंकरबाबा पापळकरांची लक्ष्मी ही १८ वी मानसकन्या. याच बालगृहात ती लहानाची मोठी झाली. वयानुरूप तिचा विवाह मध्यप्रदशातील भैसदेही तालुक्यातील आमपाटी येथील बाबूलाल अडलक यांच्या मूकबधिर सत्यप्रकाश नामक मुलासोबत निश्चित झाला आणि ठरलेल्या तारखेवर थाटात पारही पडला. बैतुल येथे रविवारी २८० दिव्यांग युवक-युवतींच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले हेते. देशातील १४० दिव्यांग जोडप्यांचा हा सामूहिक विवाह सोहळा होता. यामध्ये मूकबधिर लक्ष्मी आणि सत्यप्रकाशची जोडी सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली होती. निराधार लक्ष्मीचे शिक्षण पाढर येथील आश्रमशाळेत झाले. तेथील अधीक्षिका कैथवास यांनी लक्ष्मीला स्वत:च्या मुलीप्रमाणे वाढविले. नवदाम्पत्याला मान्यवरांचे आशीर्वादबैतुल येथे पार पडलेल्या १४० जोडप्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्याला शंकरबाबा पापळकरांसह अधीक्षिका कैथवास, अकोटकर यांच्यासह बैतुलचे जिल्हाधिकारी शशांक मिश्रा, अपर जिल्हाधिकारी मूलचंद वर्मा, भैसदेहीचे नगराध्यक्ष अनिल ठाकूर यांची उपस्थिती होती. पोलीस अधीक्षक राकेश जैन, आ. हेमंत खंडेलवाल, मंगलसिंह धुर्वे, अल्केश आर्य यांच्यासह शेकडो मान्यवरांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद दिलेत.शंकरबाबांच्या १८ मुलींचे विवाहशंकरबाबा पापळकर हे १२३ अनाथ, अपंगांचे पिता आहेत. त्यापैकी १८ मुला-मुलींचे विवाह पार पडले आहेत. १७ मुला-मुलींचे विवाह महाराष्ट्रातच करण्यात आले. मात्र, १८ वी कन्या लक्ष्मी मात्र मध्यप्रदेशची सून झाली. लवकरच शंकरबाबांच्या १९ व्या मंगल नामक मुलीचा विवाहसोहळा रावेर येथे पार पडणार आहे. ना. गिरीश महाजन हे या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. माझ्या लक्ष्मी नामक १८ व्या मुलीचा विवाह बैतूल येथे पार पडला. लवकरच मंगल नामक १९ व्या मुलीचा विवाह रावेर येथे होणार आहे. माझ्या मुली सुखाने नांदाव्यात एवढीच एक बाप म्हणून माझी अपेक्षा आहे. - शंकरबाबा पापळकर,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्तेवझ्झर, अचलपूर