शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अच्युत महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवात शंकर महाराजांना स्थान नाही

By admin | Updated: September 21, 2016 00:11 IST

ज्ञानयोगी व तपस्वी संत शंकर महाराज यांचा चतुर्थ पुण्यतिथी महोत्सव तिवसा तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथील संस्थानमध्ये २२ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.

२२ ला मौन श्रद्धांजली : उत्सवाला गालबोट नको, आश्रमाची भूमिकाअमरावती : ज्ञानयोगी व तपस्वी संत शंकर महाराज यांचा चतुर्थ पुण्यतिथी महोत्सव तिवसा तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथील संस्थानमध्ये २२ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या महोत्सवातील महत्त्वपूर्ण मौन श्रद्धांजली कार्यक्रमात २३ सप्टेंबरला शंकर महाराजांना टाळण्यात आले आहे. दरवर्षी शंकर महाराज या दिवशी उपस्थित राहतात, हे विशेष. पिंपळखुटा आश्रमासंदर्भात सुरू असलेल्या नांदगावमध्ये महोत्सवाला गालबोट नको म्हणून ही भूमिका घेण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. गुरुवारी आयोजित मौन श्रद्धांजली कार्यक्रमात वर्धमनेरी येथील संत भानुदास महाराज, अंजनगाव सुर्जी येथील आचार्य जितेंद्रनाथ महाराज व कान्होली येथील अंबादास महाराज यांना निमंत्रित केले आहेत. पुण्यतिथी महोत्सवाच्या निमंत्रण पत्रिकेत ही नावे छापण्यात आली आहेत. संत अच्युत महराजांच्या यापूर्वी झालेल्या तीनही पुण्यतिथी महोत्सवात शंकर महाराजांना अगत्याने बोलविण्यात आले होते. मात्र, यंदाच्या चतुर्थ पुण्यतिथी पर्वात मात्र शंकर महाराजांना टाळण्यात आले आहे. बुवाबाजीला स्थान नाहीअमरावती : शेंदूरजना बाजार येथे मोठ्या संख्येने असणाऱ्या मातंग समाज बांधवांनी शंकर महाराजांना कार्यक्रमात बोलविल्यास प्रचंड विरोध केला. पिंपळखुटा येथील शंकर महाराजांच्या आश्रम मातंग समाजाचा ११ वर्षीय विद्यार्थी प्रथमेश सगणे याचा नरबळी प्रकरणात गळा चिरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार नागपंचमीला घडला होता. यामुळे मातंग समाज प्रचंड प्रक्षुब्ध झाला आहे व उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी संत अच्युत महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवात शंकर महाराजांना स्थान देण्यात आलेले नाही. पिंपळखुटा येथील शंकर महाराजांच्या आश्रमातील प्रकरणासंदर्भात जिल्ह्यात वादंग सुरू आहे. या पार्श्वभूमिवर महोत्सवाला कुठलेही गालबोट लागू नये, याकरिता यंदाच्या पुण्यतिथी पर्वात शंकर महाराजांना बोलविण्यात आलेले नाही. - मनोहर निमकर,सचिव, संत अच्युत महाराज संस्थान