शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शंकर महाराज आश्रमातील वसतिगृहाची मान्यता रद्द !

By admin | Updated: September 2, 2016 00:06 IST

पिंपळखुटा येथील शंकर महाराज आश्रम ट्रस्ट अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या समाजकल्याण मागासवर्गीय मुला-मुलींच्या वसतिगृहाची मान्यता रद्द करण्याची

प्रस्ताव रवाना : औपचारिकता केवळ बाकीअमरावती : पिंपळखुटा येथील शंकर महाराज आश्रम ट्रस्ट अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या समाजकल्याण मागासवर्गीय मुला-मुलींच्या वसतिगृहाची मान्यता रद्द करण्याची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मान्यता रद्द होण्याची औपचारिकता तेवढी बाकी आहे. ‘लोकमत’च्या शोधवृत्त पत्रकारितेमुळे हे शक्य झाले, अशी प्रतिक्रिया खुद्द समाजकल्याण विभागात गुरुवारी उमटत होती. पिंपळखुटा येथे शंकर महाराज यांच्या आश्रमाच्या हद्दीत पाच शाळा-विद्यालय आणि एक वसतिगृह आहे. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय आश्रमातील समाजकल्याण वसतिगृहात केली जाते. प्रथमेश सगणे या इयत्ता पाचवीतील ११ वर्षीय गोंडस मुलाचा गळा सुरेंद्र मराठे आणि त्याच्या दोन साथिदारांनी आश्रमाच्या हद्दीत चिरला होता. नरबळी देण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी हा राक्षसी गुन्हा सुरेंद्रने केला होता. ज्या प्रथमेशचा गळा चिरण्यात आला तो आश्रमातील वसतिगृहातच वास्तव्याला होता. अजय वनवे या चांदूररेल्वे तालुक्यातील गरीब चर्मकार समाजाच्या मुलाचा चेहरा सुरेंद्र मराठे याच आरोपीने रात्री दगडाने ठेचला होता. ही घटना वसतिगृहातच घडली होती. वसतिगृहात वास्तव्यास असणारी मुले सुरक्षित नाहीत. आश्रमात कार्यरत कर्मचाऱ्यांना नरबळी देण्यासाठी या वसतिगृहातील विद्यार्थी सहज उपलब्ध होत असल्याचे शासनाच्या लक्षात आले. वसतिगृह मुलांना शिक्षणासाठी पूरक सोय निर्माण करण्याच्या दृष्टीने बहाल केले असताना तेथे चिमुकल्या मुलांचे क्रुरतेने बळी घेतले जात असतील तर ते वसतिगृह चालवायचेच कशासाठी, असा प्रश्न सामाजिक न्याय विभागासमोर निर्माण झाला. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी प्रथमेशची नागपूर येथे इस्पितळात भेट घेतल्यानंतर झालेल्या वेगवान हालचालींचा परिपाक म्हणजे वसतिगृहाची मान्यता रद्द होणे हा होय. सामाजिक न्याय विभागाने वसतिगृहाची मान्यता का रद्द करुन नये ? नरबळीच्या उद्देशाने हल्ले झाल्यानंतरही वसतिगृहाने, व्यवस्थापनाने संबंधित विभागाला त्याबाबतची माहिती का दिली नाही ? पोलिसांमध्ये या गंभीर घटनांची तक्रार का केली नाही, आदी प्रश्न चौकशीदरम्यान उपस्थित केले होते. आश्रम व्यवस्थापनाकडून देण्यात आलेली उत्तरे शासनाला मान्य झाली नाहीत. आश्रम व्यवस्थापनाने केलेली अंतर्गत चौकशी केवळ देखावा होती. व्यवस्थापनाने अक्षम्य दुर्लक्ष केले आणि कर्तव्यात कसूर केला, असा ठपका ठेवून आणि व्यवस्थापनाचा खुलासा अमान्य करुन या वसतिगृहाची मान्यता रद्दच करण्यात यावी, असा आग्रही अहवाल अमरावती येथील अधिकाऱ्यांनी पुण्याच्या आयुक्तांना ई-मेलद्वारे पाठविला. लवकरच या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल.