शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शंकर महाराजांसह १५ जणांवर फौजदारी गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 05:11 IST

पिंपळखुटा येथील शंकर महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष श्री संत शंकर महाराज यांच्यासह आश्रम ट्रस्टच्या एकूण १५ पदाधिकाऱ्यांविरुद्ध धामणगाव रेल्वे (जि.अमरावती) येथील प्रथमश्रेणी न्यायालयाने जादुटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हे नोंदवून घेत फौजदारी खटला आरंभला आहे.

- गणेश देशमुखअमरावती : पिंपळखुटा येथील शंकर महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष श्री संत शंकर महाराज यांच्यासह आश्रम ट्रस्टच्या एकूण १५ पदाधिकाऱ्यांविरुद्ध धामणगाव रेल्वे (जि.अमरावती) येथील प्रथमश्रेणी न्यायालयाने जादुटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हे नोंदवून घेत फौजदारी खटला आरंभला आहे. प्रथम श्रेणी न्यायाधीश विवेक डी. देशमुख यांनी शुक्रवारी हा महत्त्वपूर्णनिकाल दिला. जादुटोणाविरोधी कायद्यांतर्गत न्यायालयाने स्वत:हून गुन्हे नोंदवून घेणे व फौजदारी खटला भरण्याचा हा देशभरातील पहिलाच निर्णय आहे.शंकर महाराज यांच्या आश्रमात प्रथमेश सगणेचा गळा कापूनआणि अजय वणवे याचा चेहरा ठेचून नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हे दोन्ही चिमुकले आश्रम ट्रस्टद्वारे चालविण्यात येणाºया निवासी शाळेचे विद्यार्थी होते. ह्यलोकमतह्णच्या शोधपत्रकारितेमुळे या दोन्ही प्रकरणांचा भांडाफोड झाला होता.आश्रमात मोठी माया जमविलेल्या शंकर महाराज यांनी स्वानुभवाच्या आधारावर ह्यअनुभव ब्रह्मह्ण हे पुस्तक लिहिले. लघवी करून दगडाचे सोने करणे, वाट्टेल त्या व्यक्तिला वश करणे, इतरांच्या मनातील गुपिते ओळखणे, अष्टसिद्धी प्राप्त करणे अशा अनेक अंधश्रद्धा पसरविणाºया बाबी त्यांनी पुस्तकात लिहिल्या आहेत. आश्रमातील नरबळीचा प्रयत्न उघडकीस आणल्यानंतर ह्यलोकमतह्णने शंकर महाराजांच्या त्या पुस्तकातील अंधश्रद्ध लिखाणावर वृत्तमालिकेतून सवाल उपस्थित केले होते.‘लोकमत’च्या वृत्तांची दखल घेऊन अमरावतीचे वकील संजय वानखेडे यांनी ह्यअनुभव ब्रह्मह्ण पुस्तकाच्या लिखाणासाठी शंकर महाराज आणि ट्रस्टच्या पदाधिकाºयांविरुद्ध जादुटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवून अटक करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांना द्यावेत, अशी मागणी करणारी फिर्याद धामणगाव (जि.अमरावती) प्रथमश्रेणी न्यायालयात दिली होती. नरबळीचे प्रयत्न शंकर महाराज यांच्या आदेशानेच घडले, असेही वानखेडे यांचे म्हणणे होते.हे आहेत आरोपीश्री संत शंकर महाराज बुधाजी नागपुरे (अध्यक्ष, पिंपळखुटा आश्रम), नंदुसेठ बंडुजी चव्हाण (उपाध्यक्ष, धायरी, पुणे), राजेंद्र देवीदासजी लुंगे (सचिव, वर्धा), भाष्करराव रंगरावजी मोहोड (सहसचिव, अमरावती), देवेंद्र पंडितराव वºहेकर (खजिनदार, नºहे, पुणे), सुदाम बुधाजी नागपुरे (विश्वस्त, पिंपळखुटा, महाराजांचा भाऊ), बाळासाहेब ज्योतिबा दांगट (विश्वस्त, नºहे, पुणे), सुधाकर दुधारामजी बांते (विश्वस्त, अयोध्यानगर, नागपूर), शरदराव श्रीरामजी इंगळे (विश्वस्त, किर्ती कॉलनी, अमरावती), राजेश बबनराव मिंदे (विश्वस्त, धायरी, पुणे), रामदास पोपटराव दांगट (विश्वस्त, नºहे, पुणे), प्रशांत पुरुषोत्तम शेलोकार (विश्वस्त, मनीषनगर, नागपूर), संतोष वसंतराव पोकळे (विश्वस्त, यावलेवाडी, पुणे), शिरीष चंद्रकांत चौधरी (विश्वस्त, प्रसादनगर, नागपूर), नितीन वासुदेवराव राऊत (विश्वस्त, शास्त्रीनगर, अकोला).सात साक्षीदारजादुटोणाविरोधी कायद्याचे लेखण करणारे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी याप्रकरणी धामणगाव रेल्वे न्यायालयात साक्ष नोंदविली. समितीचे राष्टÑीय कार्यकारिणी सदस्य गणेश हलकारे यांनी नरबळीप्रकरणी सत्यशोधन अहवाल न्यायालयात सादर केला. साक्ष दिली. अजयची आई किरण वनवे, प्रथमेच्या बहिण प्रतीभा बापुराव राऊत तसेच नरबळीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी सुरेंद्रचे वडील रमेश मराठे, शंकर महाराजांचे जुने साथीदार सहदेव किडले यांच्या साक्षीही नोंदविण्यात आल्यात.न्यायालयाने दिलेला निकाल महत्त्वपूर्ण आहे. धर्मसत्तेच्या दबावाला न जुमानता देण्यात आलेला हा निकाल लोकरक्षणाचा नवा पायंडा रुजवेल. - श्याम मानव, सहयोगी अध्यक्ष,जादुटोणा विरोधी कायदा प्रचार, प्रसार समिती, महाराष्टÑ शासन.

टॅग्स :Courtन्यायालयAmravatiअमरावती