शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

शंकरबाबांच्या दिव्यांग मुलांना कोरोना संरक्षणाची ‘कवचकुंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:10 IST

फोटो ०८एएमपीएच०४, ०८एएमपीएच०६, कॅप्शन : दिव्यांग मुलांना लस देतेवेळी जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, मुलांची आस्थेने विचारपूस करताना जिल्हाधिकारी शैलेश ...

फोटो ०८एएमपीएच०४, ०८एएमपीएच०६,

कॅप्शन : दिव्यांग मुलांना लस देतेवेळी जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, मुलांची आस्थेने विचारपूस करताना जिल्हाधिकारी शैलेश नवाल.

इंदल चव्हाण/ नरेंद्र जावरे

अमरावती : अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील अनाथांचे नाथ असलेल्या शंकरबाबा पापळकर यांच्या १५ दिव्यांग तथा मिरगी आजाराने ग्रस्त असलेल्या १५ मुलांना गुरुवारी कोरोनाची लस देण्यात आली. सामाजिक भान जपत शंकरबाबा व स्थानिक प्रशासन मुलांच्या लसीकरणासाठी ‘फ्रंटफुट’वर आलेत. त्या दिव्यांगांना कोरोना लसीच्या रूपाने संरक्षक कवचकुंडले दिली. मात्र, त्या मुलांची शासनस्तराववर दखल घेतली जाईल का, हा प्रश्न तूर्तास अनुत्तरित आहे.

वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद, मूकबधिर बालगृहामध्ये १२३ बेवारस दिव्यांग मुले मुली आहेत. आरोग्य विभागाच्या पथकाने ७ जून रोजी वझ्झर येथील बालगृहात येऊन तेथील मुलांना कोरोना लसीचा पहिला डोज देण्यात आला. पैकी १३ अतितिव्र मिरगीग्रस्त मुलांना लस देण्यात आली नव्हती. लस दिल्यानंतर तेथे काही गुंतागुंत निमार्ण होऊ नये, यासाठी ते थांबविण्यात आले होते.

दरम्यान, गुरूवारी आरोग्य विभागाच्या वाहनाने त्या १३ मुलांसह अन्य दोन अशा १५ मुलांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. सकाळी ११ वाजता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, मानसिक रोग तज्ञ डॉ. अमोल गुल्हाने व त्यांच्या चमुने या मुलांना कोविशिल्डचा पहिला डोस देण्यात आला. यावेळी अपंग विभागाचे प्रमोद भक्ते, डॉ. प्रीती मोरे, डॉ. तृप्ती जवादे, डॉ. देवघरे, डॉ. पवन दळणकर, आकाश चव्हाण, वझ्झर संस्थेचे मुख्याध्यापक अनिल पिहुलकर, विशेष शिक्षक नंदकिशोर आकोलकर, केअर टेकर सुभाष काळे, वार्डन वर्षा काळे, किरण केचे, उद्धव जुकरे, मंगेश गुजर, सुषमा मोहिते, युनिस ब्रदर उपस्थित होते. जवळपास सहा तास मुलांना निगराणीत ठेवण्यात आले. त्यामुलांना कुठलाही त्रास न झाल्यामुळे, नास्ता व फुल देऊन त्यांना वझ्झर आश्रमासाठी रवाना करण्यात आले.

बॉक्स

जिल्हाधिकाऱ्यांनी वाढले जेवण

शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमातील मिरगी आजाराच्या त्या १५ मुलांना लसीकरणासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आले असता, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी त्यांची भेट घेऊन स्वत: जेवण वाढले. भेट वस्तू दिल्यात. त्यांची आस्थेने विचारपूस केली. जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनीसुद्धा लसीकरणाची पूर्ण प्रक्रिया होईस्तोवर उपस्थित राहिल्याचे समाधान शंकरबाबांनी लोकमतजवळ व्यक्त केले.

या मुला-मुलींना दिली लस

सत्यम, सोनु एन.एके, मदन, दिनानाथ, गणपत, चिन्नुबाळू, योगेश, कु. चावला, कु. नैना, आम्रपाली, संपदा, मुन्नी, रोजी, गुडीया, राधा या १५ मुला-मुलींना लस देण्यात आली.

कोट

वझ्झर संस्थेत ७ जून रोजी लसीकरण शिबिर घेण्यात आले. मात्र, या १५ मुला-मुलींना अतितीव्र मिरगीचा आजार असल्याने त्यांच्यावर संशोधन करण्यात आले. त्यानंतर अमरावती येथे कोविशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला.

श्यामसुंदर निकम,

जिल्हा शल्य चिकित्सक

----------------------

स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद व मूकबधिर आश्रमातील मिरगीच्या आजाराची १० मुली व ५ मुले वास्तव्याला आहेत. २० वर्षांपासून त्यांचा सांभाळ मी करीत आहे. आता माझे वय ८० वर्षे झाले असून, शासनाने त्यांच्या पालन-पोषणाची जबाबदारी घ्यायला हवी. त्यांना गुरुवारी अमरावतीला लसीकरणासाठी पाठविले. जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्यांची सुश्रुषा केल्याचे आनंद वाटले.

- शंकरबाबा पापळकर,

समाजसुधारक, वझ्झर