शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

स्वतःच्या आईचे दागिने गहाण ठेवून 'शंकरबाबां'नी वाचवले नातवाचे  प्राण; मूकबधिर मातेच्या कुशीत बाळ सकुशल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2021 07:15 IST

Amravati News आपल्या नातवाचे प्राण वाचवण्याची शर्थ करताना, शंकरबाबा पापळकरांनी आपल्या लेकीचे दागिने विकून रक्कम उभी केली.. त्यांना जिल्हा शल्य चिकित्सकांनीही मदतीचा हात देऊन आपली सामाजिक बांधीलकी जपली.

ठळक मुद्देजिल्हा शल्य चिकित्सकांनीही दिला मदतीचा हात

 

नरेंद्र जावरे

अमरावती : वझ्झर फाटा येथील स्व. अंबादासपंत वैद्य मूकबधिर, मतिमंद, अनाथ बालगृहामध्ये लहानाचे मोठे झालेले मूकबधिर वर्षा व समीर यांच्या मुलाच्या उपचारासाठी अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर आईचे मंगळसूत्र गहाण ठेवून खासगी रुग्णालयात पोहोचले. कर्माची नाळ जुळलेल्या नातवाला वाचविण्याची त्यांची ही धडपड पाहून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी रकमेची तरतूद केली आणि उपचाराअंती बाळ मूकबधिर मातेच्या कुशीत सकुशल विसावले.

वर्षा व समीर यांचा विवाह २० डिसेंबर २०२० रोजी नागपूर येथे तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत झाला होता. वर्षा आठ महिन्यांची गर्भवती असताना ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पोट अतिशय दुखत असल्याने तिला अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला अमरावतीला नेण्याचे सुचविले. रात्री ११ वाजता अमरावतीत दाखल झाल्यानंतर नाईलाजाने राजापेठ परिसरातील खासगी रुग्णालयात तिला दाखल केले. तेथे सोनोग्राफी, रक्त तपासणी करून सिझेरियन प्रसूतीकरिता ५० हजार रुपये ताबडतोब भरा, असे सांगण्यात आले. ही बाब प्रमिला नघाटे यांनी वझ्झर येथे शंकरबाबांना कळविली. त्यांनी दुसऱ्या दिवशी १२ वाजेपावेतो पैसे भरणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, रात्री १२ वाजता प्रसूती झाली. बाळाचे वजन १४०० ग्रॅम होते. म्हणून त्याला गाडगेनगर येथील बालरोगतज्ज्ञाकडे दाखल केले. तेथे पाच हजार रुपये प्रतिदिन खर्च सांगण्यात आला. शंकरबाबांनी बाळाच्या आईचे मंगळसूत्र, नथ, कानातले तसेच त्यांच्या आईचे जुने दागिने एका सावकाराकडे गहाण ठेवून काही रकमेची तरतूद केली. ५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी रुग्णालयात जाऊन बाळाची विशेष काळजी घेण्याचे डॉक्टरांना सांगितले. ८ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर या काळात बाळ आईपासून दूर ठेवण्यात आले. यादरम्यान बाळाचे वजन १४०० वरून २५०० ग्रॅम झाले आणि ते आईच्या कुशीत आले.

रुग्णालयातून २५ नोव्हेंबर रोजी दीड लाख भरून बाळाला घरी घेऊन जाऊ शकता, असे कळविण्यात आले. शंकरबाबांनी या रकमेसाठी अखेरचा प्रयत्न म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्याशी फोनवरून संवाद साधला. परिणामी २६ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता शंकरबाबांना बाळाला घरी घेऊन जाऊ शकता, पैसे डॉ. निकम यांनी भरले, असे कळविण्यात आले.

बालरोगतज्ज्ञांनी अथक प्रयत्नांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आणि योग्य तो उपचार करून माझ्या नातवाचे प्राण वाचविले. मुलामध्ये कुठलेही अपंगत्व नाही. माझ्या १२३ दिव्यांग मुलांच्यावतीने त्यांचे खूप आभार.

- शंकरबाबा पापळकर, ज्येष्ठ समाजसेवक, वझ्झर, अचलपूर

टॅग्स :Shankarbaba Papalkarशंकरबाबा पापळकर