लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर ते मूर्तिजापूर दरम्यान धावणाऱ्या नॅरोगेज शकुंतला रेल्वेचे प्रवासभाडे महागले आहे. ही भाडेवाढ करताना हाफ तिकीट सरसकट १० रुपये करण्यात आली आहे. तिकीटविक्रीचा गर्दीवर फारसा परिणाम झालेला नाही.अचलपूर-मूर्तिजापूर दरम्यान अचलपूर, नौबाग, चमक, खुस्ता बुजुर्ग, पथ्रोट, अंजनगाव, कापूसतळणी, कोकर्डा, लेहगाव, बनोसा, लाखपुरी आणि मूर्तिजापूर रेल्वे स्थानके आहेत. अचलपूरवरून कोकर्डा या स्थानकांदरम्यान कुठेही हाफ तिकीटचे प्रवास भाडे सरसकट १० रुपये करण्यात आली आहे. ही भाडेवाढ रेल्वे प्रशासनाने जुन्याच फलकावर अंकित केली आहे.अचलपूर ते लेहगाव, बनोसा, लाखपुरीकरिता १५ रुपये, तर मूर्तिजापूरकरिता २० रुपये तिकीट निर्धारित करण्यात आली आहे. त्याचे तिकीट कालपर्यंत १३ रुपये होते. अशा प्रकारे ‘शकुंतला’च्या प्रवासभाड्यात वाढ पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण करण्यासाठी अचलपूर रेल्वे स्थानकावर येणाºया नागरिकांचे लक्ष हा दरवाढीचा फलक वेधून घेत आहे.नॅरोगेजवर शकुंतलामूर्तिजापूर ते अचलपूर दरम्यान नॅरोगेज लोहमार्गावर ही रेल्वे गाडी धावते. ७५.६४ किमी लांबीचा हा लोहमार्ग आहे. शकुंतला या मार्गावर १०४ वर्षांपासून धावत आहे. २०१८ मध्ये भारतीय रेल्वे प्रशासनाने पहिल्यांदा आपली मोहोर या रेल्वे गाडीवर उमटवत ‘शकुंतला सवारी गाडी’ असे नामकरण केले.दरवाढीचा गर्दीवर परिणाम नाहीदेशपातळीवर रेल्वेचा अर्थसंकल्प सादर होताना तिकीट दरवाढीवर लक्ष ठेवले जाते. त्याबाबत सत्ताधारी आणि विरोधकांकडून हलकल्लोळ होतो. शकुंतला रेल्वेचे भाडेच मुळात नगण्य असल्याने या दरवाढीने प्रवाशांच्या संख्येत काहीही फरक झालेला नाही.
‘शकुंतला’च्या प्रवासभाड्यात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 23:41 IST
अचलपूर ते मूर्तिजापूर दरम्यान धावणाऱ्या नॅरोगेज शकुंतला रेल्वेचे प्रवासभाडे महागले आहे. ही भाडेवाढ करताना हाफ तिकीट सरसकट १० रुपये करण्यात आली आहे. तिकीटविक्रीचा गर्दीवर फारसा परिणाम झालेला नाही.
‘शकुंतला’च्या प्रवासभाड्यात वाढ
ठळक मुद्देअचलपूर-मूर्तिजापूर २० रुपये : हाफ तिकीट सरसकट १० रुपये, ‘हाऊसफुल्ल’ कायम