अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शकुंतलेचे ब्रॉडगेज रखडणार असून, राज्य सरकारने ५० टक्के आर्थिक भार उचलला तरच नॅरोगेज शकुंतलेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर शक्य आहे. यासाठी रेल्वे मंत्रालय चार वर्षांपासून राज्य सरकारच्या होकाराची वाट बघत आहे.यवतमाळ-मुर्तिजापूर ११३ किलोमीटर, मूर्तिजापूर-अचलपूर ७७ किमी लांबीच्या लोहमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतराचा सर्वप्रथम १९९२ ला भारतीय रेल्वेने प्रयत्न केला. राज्य सरकार अपेक्षित खर्चापैकी ५० टक्के आर्थिक भार उचलत असेल तरच रूपांतर करावे, या अटीवर त्यास नियोजन आयोगाने मान्यता दिली होती. पण, यासाठी पुरेसा निधी उपलब्ध न झाल्यामुळे हा प्रस्ताव बारगळला. नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याच्या अनुषंगाने सन २००८ मध्ये नव्याने सर्वे करून ४५४ कोटी ७८ लाखांचा अपेक्षित खर्चाचा प्रस्ताव तयार केला गेला. अपेक्षित खर्च बघता परत प्रस्ताव दुर्लक्षित राहिला. याच प्रस्तावात काही बदल करून १ हजार ५५१ कोटींचा प्रस्ताव नव्याने केला गेला. याची ६ मार्च २०१४ ला राज्य सरकारला माहिती दिली गेली. नियोजन आयोगाच्या सूचनेनुसार या प्रस्तावाच्या अनुषंगाने ५० टक्के आर्थिक भार उचलण्यासोबतच विनामूल्य जमीन उपलब्ध करून देण्याची विनंती रेल्वे मंत्रालयाने राज्य सरकारकडे केली. याला राज्य सरकारने प्रतिसाद दिला नाही. दरम्यान तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी १ हजार ५५१ कोटींच्या या प्रस्तावास तत्त्वत: मान्यता व निर्देशही दिलेत. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या सकारात्मक प्रयत्नाकडेही राज्य सरकारने दुर्लक्ष केले. २०१४ पासून रेल्वे मंत्रालय राज्य सरकारच्या होकाराच्या प्रतीक्षेत आहे. ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करताना फॉरेस्ट क्लिअरन्सही आवश्यक आहे. या प्रस्तावाला अद्याप राज्य सरकारने संमती दिली नसल्याने हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला नियोजन आयोगापुढे ठेवता आला नाही.धावत्या रेल्वेत आज कविसंमेलनशकुंतलेच्या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर व्हावे, चांगले दिवस यावेत, यासाठी खासदार भावना गवळी, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार बच्चू कडू, मायी खासदार अनंत गुढे प्रयत्नशील आहेत. तथापि राज्य सरकारच्या इच्छाशक्तीवरच शकुंतलेचा उद्धार शक्य आहे. राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी साहित्यिक व कवी १६ डिसेंबरला अचलपूर ते दर्यापूरदरम्यान धावत्या शकुंतलेत कविसंमेलन करीत आहेत. शकुंतलेच्या वेदना उजागर करण्याचा हा अभिनव प्रयत्न आहे.
शकुंतलेचे ब्रॉडगेज रखडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 22:12 IST
शकुंतलेचे ब्रॉडगेज रखडणार असून, राज्य सरकारने ५० टक्के आर्थिक भार उचलला तरच नॅरोगेज शकुंतलेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर शक्य आहे. यासाठी रेल्वे मंत्रालय चार वर्षांपासून राज्य सरकारच्या होकाराची वाट बघत आहे.
शकुंतलेचे ब्रॉडगेज रखडणार
ठळक मुद्देराज्य सरकारने ५० टक्के भार उचलावा : रेल्वे मंत्रालय अद्याप प्रतीक्षेतच