शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

शून्य सावली आज अनुभवता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 22:22 IST

आयुष्यात सगळ्यांनी जरी साथ सोडली तरी माणसाच्या नेहमी सोबत असणारी त्याची सावली ही साथ सोडत नसते. मात्र, उत्तरायण आणि दक्षिणायनाच्या प्रवासामधील दोन दिवस सूर्य पृथ्वीच्या थेट मध्यावर अर्थात डोक्यावर येतो.

अमरावती : आयुष्यात सगळ्यांनी जरी साथ सोडली तरी माणसाच्या नेहमी सोबत असणारी त्याची सावली ही साथ सोडत नसते. मात्र, उत्तरायण आणि दक्षिणायनाच्या प्रवासामधील दोन दिवस सूर्य पृथ्वीच्या थेट मध्यावर अर्थात डोक्यावर येतो. सूर्यकिरणे डोक्यावर पडत असल्यामुळे प्रत्येक वस्तूची सावली ही पायाजवळ पडते वा अदृश्यही होते. अमरावतीकरांना असाच काहीसा अनुभव शुक्रवार, २५ मे रोजी दुपारी १२.३० वाजता ५२ सेकंदांसाठी येईल. झीरो शॅडो डेच्या कुतूहल असल्याने शहरवासीयांसाठी शुक्रवार हा वैशिष्ट्यपूूर्ण ठरणार आहे.कर्कवृत्त आणि मकर वृत्त या दोन वृत्तांमध्ये राहणाऱ्या लोकांना वर्षातून दोन वेळेला शू्न्य सावलीचा अनुभव घेता येतो. कर्कवृत्त, मकर वृत्त आणि विषुववृत्त या वृत्तावर वर्षातून एकदाच शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. कर्कवृत्ताच्या वरच्या भागात व मकर वृत्ताच्या खालच्या भागात राहणाºया लोकांना मात्र या शून्य सावलीचा आनंद घेता येत नाही.पृथ्वी ही कर्कवृत्तावरून बरोबर तीन महिन्यांनी वसंत संपात बिंदूपाशी येते. या दिवशी १२ तासांची रात्र आणि १२ तासांचा दिवस असतो, तर सूर्याची किरणे विषुववृत्तावरती वरून पडतात. यामुळे विषुववृत्तावर कुठेही आपण उभे राहिलो तरी काही काळासाठी आपली सावली गायब होते. यानंतर बरोबर तीन महिन्यानंतर मकर वृत्तावर, तीन महिन्यांनी विषुववृत्तावर आणि नंतर पुन्हा तीन महिन्यानंतर कर्कवृत्तावर शून्य सावलीचा आनंद घेता येणार आहे. जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती गायब होते. मरेपर्यंत सोबतीला असलेली सावली ही अचानक ‘शून्य सावली’ झाल्याचा रोमांच जरूर अनुभवावा, असे आवाहन खगोलतज्ज्ञांनी केले आहे.