शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अपंग तरुणाचे लैंगिक शोषण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:03 IST

एका ७० वर्षीय वृद्धाने अपंग तरुणाचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाने रविवारी रात्री शहरात खळबळ उडाली.

ठळक मुद्देप्रकरण चौकशीत : दोन समुदाय आमने-सामने

आॅनलाईन लोकमतअमरावती : एका ७० वर्षीय वृद्धाने अपंग तरुणाचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाने रविवारी रात्री शहरात खळबळ उडाली. दोन समुदाय कोतवाली पोलीस ठाण्यात आमने-सामने आल्यानंतर तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती. मात्र, तपोवन परिसरात घटना घडल्याचे कळताच कोतवाली पोलिसांनी तक्रारकर्ता व आरोपीला गाडगेनगर पोलिसांच्या स्वाधीन केले.सोमवारी सकाळी हे प्रकरण पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्यासमक्ष ठेवण्यात आले. मात्र, पीडित तरुणाने दिलेल्या बयाणात असे काही घडलेच नसल्याची बाब समोर आली. या गंभीर आरोपाच्या प्रकरणात कसून चौकशी सुरू आहे.पायाने अपंग असलेला एक २० वर्षीय तरुण आठ दिवसांपूर्वी तपोवन येथील आश्रमात काही कामानिमित्त गेला होता. दरम्यान त्या तरुणाची ओळख एका ७० वर्षीय वृद्धासोबत झाली. दरम्यान त्या वृद्धाने त्या तरुणाजवळील महत्त्वाचे दस्तऐवज जवळच ठेवून घेतले आणि ब्लॅकमेल करून तपोवनजवळील एका ठिकाणी त्या तरुणाला नेऊन लैंगिक शोषण केल्याचे तो तरुण पोलिसांना सांगत होता. रविवारी रात्री त्या तरुणाने घटनेचे कथन कोतवाली पोलिसांसमोर केले होते. त्यामुळे कोतवाली ठाण्यात दोन समाजातील नागरिकांची गर्दी जमली होती. या प्रकरणामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे ठाणेदार दिलीप पाटील यांनी संबंधित प्रकरणातील घटनास्थळाची शहानिशा केली. तेव्हा ही घटना गाडगेनगर हद्दीतील तपोवन परिसरात घडल्याचे त्या तरुणाने पोलिसांना सांगितले. त्यामुळे हे प्रकरण गाडगेनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. घटनेची गंभीरता पाहता पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते. हे प्रकरण पोलीस उपायुक्त चिन्मय पंडीत यांच्यासमक्ष ठेवण्यात आल्यावर त्यांनी त्या तरुणाचे व आरोपींसह त्यांच्या नातेवाईकांचे बयाण नोंदविले. मात्र, या बयाणामध्ये त्या तरुणावर लैंगिक शोषण झालेच नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण चौकशीत ठेवले असून त्यातील तत्थे शोधण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.लैंगिक शोषण झाले नसल्याचे बयाण त्या तरुणाने दिले आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत कारवाई करण्यात आली नाही. मात्र, या प्रकरणाची चौकशी सुरू असून काही तथ्य आढळल्यास गुन्हे नोंदविण्यात येईल.- चिन्मय पंडित,पोलीस उपायुक्त