शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रशासनाला नाही कोरोना संसर्गाचे गांभीर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 05:00 IST

बडनेरा रेल्वे स्थानक जिल्ह्यात वर्दळीचे व जंक्शन  म्हणून परिचित आहे. येथून मोठा प्रवासी वर्ग ये-जा करीत असतो. अमरावती जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये काही दिवसांत प्रचंड वाढ झाली आहे. संसर्ग प्रवाशांदरम्यान पसरू शकतो. एका रेल्वेगाडीत शेकडो प्रवासी असतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून ते प्रवास करीत असतात. त्यांच्यातही कोरोनाबाबत औदासीन्य असून, बहुतेक जण मास्क लावत नसल्याचे चित्र आहे. 

ठळक मुद्देस्थानकावर, रेल्वेत मास्कची सक्ती नाही, थर्मल स्क्रीनिंग नियमित करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : सध्या कोरोना रुग्णांमध्ये जिल्ह्यात प्रचंड वाढ झाली आहे. अशातच रेल्वे प्रवाशांमध्ये मास्कचा अभाव, रेल्वे स्थानकावर थर्मल स्क्रीनिंगच्या अनियमिततेमुळे संसर्ग पसरू शकतो, हे नाकारता येणार नाही. रेल्वे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेणे तेवढेच गरजेचे झाले आहे.बडनेरा रेल्वे स्थानक जिल्ह्यात वर्दळीचे व जंक्शन  म्हणून परिचित आहे. येथून मोठा प्रवासी वर्ग ये-जा करीत असतो. अमरावती जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये काही दिवसांत प्रचंड वाढ झाली आहे. संसर्ग प्रवाशांदरम्यान पसरू शकतो. एका रेल्वेगाडीत शेकडो प्रवासी असतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून ते प्रवास करीत असतात. त्यांच्यातही कोरोनाबाबत औदासीन्य असून, बहुतेक जण मास्क लावत नसल्याचे चित्र आहे.  रेल्वे प्रवाशांमधून कोरोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी जनरल डब्यांमध्येदेखील आरक्षित तिकिटाचे  नियोजन रेल्वे प्रशासनाने आखले आहे. रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी होऊ नये, हादेखील त्यामागचा हेतू आहे. यामुळे गर्दी टळली तरी असले तरी मात्र बहुतांश प्रवासी मास्क न लावताच प्रवास करीत असल्याचे समोर येत आहे. बडनेरा रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग नियमित होत नसल्याची ओरड नियम पाळणाऱ्या प्रवाशांमध्ये आहे. काही रेल्वेगाड्यांच्या प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग होते, तर काही गाड्यांमध्ये ही सुविधा नाही. महाराष्ट्र एक्स्प्रेस १६ फेब्रुवारी रोजी दाखल झाली तेव्हा बडनेरा रेल्वे स्थानकावर व बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग झाली नाही. असेच कामकाज सुरू राहिल्यास संसर्ग वाढण्यास रेल्वे स्थानकाची नक्कीच भर पडेल. रेल्वे स्थानकावर नियमित स्क्रीनिंग होणे अत्यंत गरजेचे आहे. कारण आता रेल्वे गाड्या व प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. प्रवाशांकडून मास्कचा वापर, रेल्वे स्थानकावर प्रत्येक प्रवाशाचे थर्मल स्क्रीनिंग याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे तसेच प्रवाशांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.

टॅग्स :railwayरेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या