शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

संततधार पाऊस, अन्नाविना अनोळखी इसमाचा मृत्यू

By admin | Updated: August 9, 2015 00:24 IST

राहायला घर नाही, खायला अन्न नाही. त्यात संततधार पाऊस आणि वातावरणात गारवा, अशा स्थितीत परिस्थितीने आधीच जीर्ण झालेल्या ...

परिचारिका वसतिगृहासमोरील घटना : निराधार, बेघर नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायमचवैभव बाबरेकर अमरावतीराहायला घर नाही, खायला अन्न नाही. त्यात संततधार पाऊस आणि वातावरणात गारवा, अशा स्थितीत परिस्थितीने आधीच जीर्ण झालेल्या आणि दररोज फुटपाथवर झोपणाऱ्या त्या अनोळखी इसमाला तग धरता आला नाही. थंडी व अन्नाविना तडफडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी इर्विन चौकातील परिचारिका वसतिगृहासमोर घडली. अद्याप ‘त्या’ अनोळखी इसमाची ओळख पटली नसून शहर कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ४८ तास संततधार पाऊस बरसला. या तीन दिवसांत शेकडो निराधार व बेघर नागरिकांचे अक्षरश: हालहाल झाले. पाऊस नसताना निदान उघड्यावर जीवन कंठणाऱ्या लोकांना एखाद्या सहृदयाकडून खायला तरी मिळते. पण, पावसात ती देखील सोय होत नाही. त्यात पावसामुळे वातावरण गारठलेले. अंगावर पुरते कपडे नाहीत. त्यामुळे हा गारठा आणि पोटात उठलेल्या भुकेच्या आगडोंबामुळेच ‘त्या’ निराधाराचा मृत्यू झाला. परिचारिका वसतिगृहासमोरील फुटपाथ भिकाऱ्यांचे आश्रयस्थान बनले आहे. येथे अनेक दिवसांपासून चार भिकारी तळ ठोकून आहेत. यातील एकाची अवस्था काही दिवसांपासून अन्नावाचून अत्यंत वाईट झाली होती. त्यातच त्याच्या पायाला दुखापत झाल्याने तो चालू शकत नव्हता. पावसामुळे त्याला मदतही मिळाली नाही. शेवटी शनिवारी सकाळी भुकेने तडफडून त्याचा मृत्यू झाला. महापालिकेचे आश्रयस्थान कुचकामीनिराधारांसाठी महानगरपालिकेने आश्रयस्थाने उघडली आहेत. मात्र, ती कुचकामी ठरत आहेत. शहरात विविध भागात अनेक लोक भीक मागतात. मात्र, पाऊस व थंडीच्या वातावरणात बहुतांश निराधारांचा मृत्यू होतो. दरवर्षीच शहरात हे चित्र पाहायला मिळते. संततधार पाऊस, थंडी आणि भुकेमुळे अशक्तपणा येतो. ‘त्या’ अनोळखी इसमाच्या पायाला दुखापत होती. त्याचा अन्नाविना मृत्यू झाल्याची शक्यता आहे. मृत्यूचे निश्चित कारण शवविच्छेदनांतर कळेल. - सुनीता मेश्राम, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रूग्णालय.