शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला सात वर्षांची शिक्षा

By admin | Updated: August 30, 2016 00:02 IST

तपोवन वसतिगृहातील एका १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने सोमवारी ठोठावली.

तपोवन वसतिगृहातील प्रकरण : न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णयअमरावती : तपोवन वसतिगृहातील एका १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने सोमवारी ठोठावली. दादाराव गिरीराम खंडारे (५०,रा. तपोवन वसतिगृह) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपोवनमध्ये अनाथ मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड होताच राज्यभरात खळबळ उडाली होती. तपोवन येथील शाळेत शिक्षण घेणारी पीडित १७ वर्षीय मुलगी ही १० आॅक्टोबर रोजी सुटीच्या दिवशी वसतिगृहात एकटीच होती. ती वसतिगृहाच्या आवारात फिरत असताना आरोपी दादारावने तिला ‘कर्णफूल’ या निवासस्थानी बोलविले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही बाब काही दिवस उघड झाली नव्हती. मात्र, मुलीने धाडस दाखवून २१ डिसेंबर २०१४ रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्यात नोंदविली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी दादाराव खंडारेविरूद्ध भादंविच्या कलम ३७६(ब), सह पॉक्सोची कलम ४, ६, ८, १०, १२ नुसार गुन्हा नोंदविला होता. याप्रकरणात सहायक पोलीस आयुक्त एस.एन.तळवी यांनी तपासकार्य पूर्ण करून १८ फेब्रुवारी २०१५ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. जिल्हा न्यायाधीश (२) व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.डब्ल्यू. चव्हाण यांच्या न्यायालयात सरकारी अभियोक्ता परीक्षित गणोरकर यांनी तीन साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षांच्या युक्तीवादानंतर आरोपीला भादंविच्या कलम ३७६ व पॉक्सो ६,१०, १२ नुसार दोषमुक्त करण्यात आले तर पॉक्सो ४, ८ मध्ये अनुक्रमे ७ व ३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्या मार्गदर्शनात पैरवी अधिकारी म्हणून गोपाल भारती यांनी कामकाज पाहिले. ‘लोकमत’ने केला होता पाठपुरावातपोवन येथील मुलींच्या वसतिगृहामध्ये वास्तव्यास असलेल्या मुली असुरक्षित असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने लोकदरबारात मांडले होते. त्याचा सातत्याने पाठपुरावा केला होता. पुढे तपोवनमधील मुले, मुली असुरक्षित असल्याचे मान्य करुन त्यांना इतरत्र हलविण्यात आले होते.