शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सात वाघांचे दर्शन

By admin | Updated: May 22, 2014 00:45 IST

बुद्ध पौर्णिमेला मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत झालेल्या वन्यप्राणी गणनेत

 अमरावती : बुद्ध पौर्णिमेला मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत झालेल्या वन्यप्राणी गणनेत सात वार्घंनी विविध पाणवठय़ावर निसर्गप्रेमींना दर्शन दिले आहेत. ९६0 पाणवठय़ावर केल्या गेलेल्या गणनेत ९ हजार ८११ वन्यप्राण्यांची संख्या निसर्गप्रेमीनी टिपली आहे. मेळघाटात ३0 च्या जवळपास वाघांची संख्या असल्याचे सांगण्यात येत होते.

दरवर्षी

उन्हाळ्यात वन्यप्राण्यांची गणना वनविभागामार्फत केली जाते. या प्रगणनेकरिता निसर्गप्रेमीमध्ये उत्साह दिसून येते. मेळघाटातील जगलांत जाऊन मचांगवर बसणे व पाणवठय़ावर पाणी पिण्याकरिता येणार्‍या वन्यप्राण्यांवर लक्ष ठेवून ती आकडेवारी जमा करण्याचे कार्य निसर्गप्रेमी करतात. भारताच्या नऊ व्याघ्र प्रकल्पांपैकी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र २0२९.0४ चौ.की.मी.आहे. त्यामध्ये सिपना वन्यजीव विभाग, गुगामल वन्यजीव विभाग, अकोट वन्यजीव विभाग असून त्याअंतर्गत मेळघाट, वान, अंबाबरवा, नरनाळा अभयारण्य व गुगामल राष्ट्रीय उद्यान यांचा समावेश आहे. तसेच अकोला वन्यजीव विभागातील काटेपूर्णा व ज्ञानगंगा अभयारण्य अंतर्भाव आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत एकूण १३ परिक्षेत्र व अकोला वन्यजीव विभागांतर्गत ३ परीक्षेत्र असून या सर्व परीक्षेत्रामध्ये ९६0 पाणवठे आहेत. त्यापैकी ४७६ निवडक पाणवठय़ावर १४ व १५ मे रोजीच्या बुद्ध पौणिर्मेला वन्यजीव प्रगणना करण्यात आली. या प्रगणमध्ये वनविभागाचे क्षेत्रिय अधिकारी व कर्मचारी, ४६७ निसर्ग प्रेमींनी सहभाग नोंदविला. याकरिता ४७६ मचांग तयार करण्यात आल्या होत्या. प्रत्येक मचांगवर निसर्गप्रेमीनी पाणवठय़ावर लक्ष केंद्रित करुन वन्यप्राण्यचिंी गणना केली आहे. यावेळी प्रगणनेत जंगलाचा राजाचे दर्शन घडले असून विविध ठिकाणच्या पाणवठय़ावर सात वाघ आढळून आले आहेत. त्यामुळे निसर्गप्रेमीमध्ये आंनद व्यक्त होत आहे. या व्यतिरिक्त ४२ बिबट, २३ तडस, २७२ अस्वल, ४७१ गवा, ४१८ सांबर, ४४१ चितळ, ५१२ निलगाय, ४४१ भेडकी, ४९ सायाळ, ५ चौसिंगा, १३ चिंकारा, ३४ मसण्याउद, ६ चांदी अस्वल, १५७२ रानडुक्कर, २३२३ माकड, ८९१ मोर, ५६ रानमांजर यांच्यासह आदी वन्यप्राणी निसर्गप्रेमींना आढळून आले आहेत. यंदाच्या प्रगणनेत ९ हजार ८११ वन्यप्राण्यांचे दर्शन निसर्ग प्रेमीना घडले आहे. (प्रतिनिधी)