शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यातील सात हजार गावे ढालपूजनासाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 12:15 IST

आदिवासी गोवारी समाजाचा पारंपरिक उत्सव असलेल्या ढालपूजननासाठी सात हजार गावे सज्ज झाली असून, या गावांत रात्रीला पूर्वतयारीचा सराव करण्यात येत आहे.

ठळक मुद्देआदिवासी गोवारी समाजाची परंपरा रात्रीला होतोय सराव

मोहन राऊतलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आदिवासी गोवारी समाजाचा पारंपरिक उत्सव असलेल्या ढालपूजननासाठी सात हजार गावे सज्ज झाली असून, या गावांत रात्रीला पूर्वतयारीचा सराव करण्यात येत आहे.गावातील लोकांची जनावरे चारून महिन्याकाठी मिळणाऱ्या ५० रुपयांच्या चराईवर आजही गोवारी समाज आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करतोय. पूर्व विदर्भात अधिक संख्येने असलेल्या या आदिवासी गोवारी समाजासाठी ढाल पूजन उत्सव अधिक महत्त्वाचा असतो. या उत्सवाची तयारी १५ दिवसपूर्वीच गावागावांत झली आहे. उत्सवात वाजविण्यासाठी लागणारी डफली तयार केली जात आहे. अंबाडीची झाडे आणून विविध साहित्य तयार करण्याचे काम सुरू आहे. ज्या गावात अंबाडी मिळत नसेल तिथे प्लास्टिक व त्यांच्या दोरीपासून साहित्य बनवली जात आहे. दिवसभर ही कामे होत असली तरी रात्रीला नृत्याचा सराव सुरू असतो.

दिवाळीच्या पाडव्याला उत्सवदिवाळीच्या पाडव्याला होणाऱ्या उत्सवाच्या दिवशी जनावरांना लक्ष्मीसारखे सजविले जातात. सायंकाळी गावात गुरे गावातील मुख्य मार्गाने फिरवून फटाक्यांच्या आतषबाजीत प्रत्येक गाय हंबरण्याच्या वेळेपर्यंत नाचविण्याची परंपरा आहे. तत्पूर्वी दोन बाशांवर फडके म्हणजे पुरुष म्हणजे गोहळा तर स्त्री म्हणजे गोहळी उभारण्यात येते. दुपारी प्रथम सुताराच्या घरी या ढालीला पाणी पिण्यासाठी नेल्यानंतर खऱ्या अर्थाने आदिवासी गोवारी बांधव नृत्याला सुरुवात करते डफली व मुरलीच्या निनादात दादरे रंगल्याने नृत्यात अधिक रंगत येथे हा उत्सव दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गावागावांत साजरा करण्यात येतो. या उत्सवात प्रत्येक ग्रामस्थ सहभागी होतो. या उत्सवाला सव्वादोनशे वर्षांची परंपरा आहे. पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वर्धा व गोंदिया जिल्ह्यात हा उत्सव सतत तीन दिवस चालतो.शेकडो वर्षांची ढाल पूजनाची गोवारी समाजाची परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून हातावर आणून पानावर खाणारी ही जमात आजही अठराविश्वे दारिर्द्यात जगते सरकारने सकारात्मक पावले उचलून त्वरित उच्च न्यायालयाचे अंमलबजावणी करावी.- शालिक नेवारे, समन्वयक राज्य समन्वयक आदिवासी गोवारी जमात समन्वय समिती नागपूर

टॅग्स :Diwaliदिवाळी