शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha Election 2019; अमरावती जिल्ह्यातील आठ मतदारसंघांसाठी आयोगाचे सात ‘ऑब्झर्व्हर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 12:26 IST

अमरावती जिल्ह्यात आठ मतदारसंघांतील निवडणूक प्रक्रिया गतिमान झालेली आहे. या अनुषंगाने आयोगाचे सात ऑब्झर्व्हर जिल्ह्यात येणार आहेत. यापैकी निवडणूक खर्चाचे तीन निरीक्षक जिल्ह्यात मागील आठवड्यात दाखल झालेले आहेत.

ठळक मुद्देसामान्य निरीक्षक ४ ऑक्टोबरनंतर निवडणूक खर्चाचे तीन निरीक्षक डेरेदाखल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात आठ मतदारसंघांतील निवडणूक प्रक्रिया गतिमान झालेली आहे. या अनुषंगाने आयोगाचे सात ऑब्झर्व्हर जिल्ह्यात येणार आहेत. यापैकी निवडणूक खर्चाचे तीन निरीक्षक जिल्ह्यात मागील आठवड्यात दाखल झालेले आहेत.जिल्हा निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आयोगाचे सामान्य निरीक्षक मध्य प्रदेश येथील आयएएस राजीव शर्मा यांच्याकडे धामणगाव रेल्वे व बडनेरा, राजस्थान येथील आयएएस जितेंद्रकुमार सोनी यांच्याकडे अमरावती, तिवसा, ओरिसा येथील आयएएस प्रेमानंद खुंटिया यांच्याकडे दर्यापूर व मेळघाट तसेच राजस्थानचे आयएएस महावीर प्रसाद वर्मा यांच्याकडे अचलपूर व मोर्शी विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी आहे. याव्यतिरिक्त आठही विधानसभा मतदारसंघांतील कायदा व सुव्यवस्थेची आयपीएस गुरशरणसिंग संधू यांच्याकडे जबाबदारी आहे.आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये ४ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जाची प्रक्रिया संपुष्टात येईल. त्यानंतरच आयोगाचे चारही सामान्य निरीक्षक जिल्ह्यात डेरेदाखल होणार आहेत. त्याच दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचे निरीक्षकदेखील जिल्ह्यात येणार असल्याची माहिती आहे.

निवडणूक खर्चाचा आढावानिवडणूक निरीक्षण (उमेदवारी खर्च) साठी आयोगाद्वारे आंध्र प्रदेशचे आयआरएस रामकृष्ण बंदी यांच्याकडे धामणगाव, बडनेरा व अमरावती विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी आहे. आसाम येथील आयआरएस अरुप चॅटर्जी यांच्याकडे मेळघाट व अचलपूर विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी आहे तसेच केरळ येथील आयआरएस जॉर्ज जोसेफ यांच्याकडे तिवसा, दर्यापूर व मोर्शी विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी आहे. हे तीनही निरीक्षक जिल्ह्यात दाखल झालेले आहेत व त्यांनी पथक व नोडल अधिकाऱ्यांद्वारे आढावा घेतला आहे.

टॅग्स :amravati-acअमरावती