पाईपलाईनला गळती : शहरातही दररोज ३० टक्के पाण्याची नासाडीवैभव बाबरेकर अमरावतीसिंभोरा धरणातून ११८ दशलक्ष लिटर पाण्याची उचल दररोज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून केली जाते. मात्र, हे पाणी जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पोहोचण्यापूर्वीच सात दशलक्ष लिटर पाण्याची गळती होत आहे. शहरातही दररोज ३० टक्के पाण्याचा गळतीमुळे अपव्यय होत आहे. एकीकडे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे घसा कोरडा करून सांगितले जाते, तर दुसरीकडे कितीतरी पाण्याची अशी विनाकारण नासाडी होत आहे. जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाई उद्भवते. अनेक ठिकाणी तर पावसाळा, हिवाळ्यातही पाणीटंचाई भासते. मात्र, तरीही पाण्याचा हा अपव्यय रोखला जात नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत दररोज सिंभोरा धरणातून ११८ दशलक्ष लिटर पाण्याची उचल करून अमरावती शहराला दररोज ११० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, विनाकारण होणारा पाण्याचा अपव्यय रोखण्याचे प्रयत्न होेत नाहीत. गळतीमुळे दूषित पाणीपुरवठासिंभोरा धरणातील पाणी जलशुध्दीकरण केंद्रावर शुध्द होते. मात्र, तेथून शहरात पाणी पुरवठा करताना होणारी गळती, पाणी चोरी, अपव्यय व नाल्यातून गेलेल्या लिकेज पाईपलाईनमुळे पाणी दूषित होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. चोरी न करता अधिकृत नळजोडणी करून घेणे आवश्यक आहे. सिंभोरा धरणातून जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाणीपुरवठा होतो. दरम्यान पाईप लाइनमधून सात दशलक्ष लिटर पाणी गळतीमुळे वाया जाते. पाणी गळती रोखण्याचा प्रयत्न जीवन प्राधिकरणमार्फत होत आहेत.- डी.एन. आमले, उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
सात दशलक्ष लिटर पाण्याचा अपव्यय
By admin | Updated: June 29, 2015 00:34 IST