शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बेंबळा नदीपात्रातून सव्वासहा लाखांचा गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 23:46 IST

तालुक्यातील तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेंबळा नदीपात्रातून सव्वासहा लाख रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला. बेशरमच्या झुडुपांमध्ये गांजाचा हा साठा लपवून ठेवला होता.

ठळक मुद्देतळेगाव पोलिसांची कारवाई : बेशरमच्या झुडपात लपविले सहा पोते

आॅनलाईन लोकमतधामणगाव रेल्वे/तळेगाव दशासर : तालुक्यातील तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेंबळा नदीपात्रातून सव्वासहा लाख रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला. बेशरमच्या झुडुपांमध्ये गांजाचा हा साठा लपवून ठेवला होता.येरड-खरबी शिवारातून वाहणाऱ्या बेंबळा नदीच्या काठावर गांजाचे दोन पोते असल्याची माहिती खरबी येथील पोलीस पाटील रामेश्वर मेश्राम (३३) यांनी शुक्रवारी रात्री तळेगाव दशासर पोलीस ठाण्याला दिली. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय, पोलीस पथक, धामणगावचे नायब तहसीलदार देवेंद्र सवई व दत्तापूरचे ठाणेदार अशोक लांडे व सहकारी यांनी रात्री ११.३० वाजता घटनास्थळी जाऊन शहानिशा केली. पोलीस पथक तैनात करण्यात आले. रात्र बरीच झाल्याने शनिवारी पहाटे दत्तापूर ठाण्याचे नायक बघेल, संजय भोपळे, नरेश कोलामी, पवन महाजन, वाहनचालक संजय प्रधान, प्रदीप मस्के यांच्या चमूने सहभाग घेतला. घटनास्थळाचा खरबीचे तलाठी अरविंद सराड, टिटवाचे तलाठी नितीन धोटे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. जप्ती मोहीम राबविण्यात आली.तळेगावपासून २५ किमी अंतरावर असलेल्या खरबी/येरड शिवारात बेंबळा नदीपात्रात बेशरम वनस्पतीच्या झुडुपाजवळ एक प्लास्टिक ताडपत्री पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यामध्ये दोन गोणपाटात गांजाचा हिरवा पाला भरला होता. या गांजाचे एकूण वजन ७१.६७० किलो भरले. त्याची ३ लाख ५८ हजार ३५० रुपये किंमत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.पोलिसांना या जागेपासून काही अंतरावर आणखी चार पोते चिकटपट्टीने बंद केलेल्या अवस्थेत आढळून आले. त्याचे एकूण वजन ५३.२२० किलो भरले. त्याची किंमत २ लाख ६६ हजार १०० रुपये आकारण्यात आली आहे.दोन्ही घटनास्थळावरून ६ लाख २४ हजार ७७० रुपये किमतीचा १२४.८९० किलो गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी वृत्त लिहिस्तोवर अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे तळेगाव पोलिसांनी सांगितले.