शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

कोरोनाचे सात मृत्यू, 727 पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील कोरोनाच्या उद्रेकावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा व महापालिका प्रशासनाद्वारे बैठकांचा रतीब सुरू आहे. महापालिकेत आयुक्त प्रशांत रोडे यांनी होम आयसोलेशन व स्वॅब सेंटरचा आढावा घेतला, तर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केंद्रांना भेटी दिल्या व सर्व धर्मगुरूंसोबत बैठक घेऊन नागरिकांना कोरोनाप्रति जागरूक होण्याचे आवाहन केले आहे.

ठळक मुद्देकोरोना संसर्गाचा पुन्हा हादरा, जिल्हा प्रशासनाचा बैठकांचा केवळ रतीब

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना संसर्गाने शनिवारी सात जणांचा मृत्यू झाला असून पुन्हा ७२७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. २,१३१ नमुन्यांच्या तपासणीतून हा आकडा पुढे आला आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता २८,८१५ इतकी झाली आहे. राज्यात सर्वाधिक संक्रमित रुग्णांची नोंद अमरावती जिल्ह्यात होत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.जिल्ह्यातील कोरोनाच्या उद्रेकावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा व महापालिका प्रशासनाद्वारे बैठकांचा रतीब सुरू आहे. महापालिकेत आयुक्त प्रशांत रोडे यांनी होम आयसोलेशन व स्वॅब सेंटरचा आढावा घेतला, तर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केंद्रांना भेटी दिल्या व सर्व धर्मगुरूंसोबत बैठक घेऊन नागरिकांना कोरोनाप्रति जागरूक होण्याचे आवाहन केले आहे.वाढत्या रुग्णसंख्येच्या अनुषंगाने सर्वच तालुक्यांत उपचार केंद्रे सुरू झाली व नागरिकांना स्वॅब देण्यास सोईचे व्हावे, यासाठी स्वॅब सेंटरची संख्या वाढविण्यात आली आहे. शासनस्तरावरदेखील अमरावती जिल्ह्यातील वाढत्या संसर्गाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. शासनाचे अधिकारी दररोज आढावा घेत आहेत. आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांद्वारेही नियमित व्हीसीद्वारे आढावा घेण्यात येत आहे.कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात दंडनीय कारवाई सुरू आहे. जिल्ह्यात २४ तासांत उपचारादरम्यान सात कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याने संक्रमितांची मृत्युसंख्या ४६० झाली आहे. कोरोना संसर्गात मृत्यूचे सत्र सुरू झाल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे. सीएसच्या माहितीनुसार, शहरातील आनंद विहारातील ३३ वर्षीय तरुण, अर्जुननगरातील ६६ वर्षीय, छांगानीनगरातील ७९ वर्षीय, अंबापेठेतील ८४ वर्षीय, डोंगरयावली येथील ८० वर्षीय पुरुष, दीपनगरातील ६८ वर्षीय व पंचवटी चौकातील ५८ वर्षीय महिलेचा  शनिवारी मृत्यू झाला.

महापालिका क्षेत्रात कंटेनमेंट झोन घोषितशासनाच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात पुन्हा कंटेनमेंट झोन जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शनिवारी महापालिका प्रशासनाद्वारे श्रीकृष्ण पेठ, सबनीस प्लॉट, महाजनपुरा, एलआयसी कॉलनी, भाजीबाजार, अनुराधानगर (सद्गुरू धाम कॉलनीजवळ), चंद्रावतीनगर, उषा कॉलनी, भारतनगर (द्वारकानगरजवळ), साईनगर, खंडेश्वर कॉलनी, गोकुळ (उदय कॉलनीजवळ) हे कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत.

रविवारी संचारबंदीकोरोनाची संसर्गाला ब्रेक लागावा, यासाठी शनिवारी रात्री ८ ते सोमवार सकाळी ८ पर्यंत जिल्हा प्रशासनाने कर्फ्यू घोषित केलेला आहे. त्यामुळे जिल्हा पूर्णपणे ठप्प असणे अपेक्षित आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या