अवैध उत्खनन भोवले : मनाई हुकूम जारीअमरावती : नजीकच्या बोरगाव येथील ड्रिमलॅण्ड प्रतिष्ठानने अवैध उत्खनन केल्याप्रकरणी ६ कोटी ९९ लाख ८१ हजार २८४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.ड्रिमलॅण्ड प्रतिष्ठानचे बांधकाम सुरू असताना सदर प्रतिष्ठानचे संचालक नरेंंद्र भाराणी यांनी ६,७९८ ब्रास मुरुम अवैध उत्खनन करून वापर केला. गौण खनीजाचा वापर करताना कोणतीही परवानगी घेतली नाही. बोरगाव येथील तलाठ्यांनी ही बाब तहसीलदार सुरेश बगळे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर अवैध उत्खनन केल्याप्रकरणी चौकशी करण्यात आली. विनापरवानगीने अवैध उत्खनन केल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारी बजावलेल्या नोटीसनुसार कामबंदचे आदेश दिले आहे. काम सुरू केल्यास फौजदारी दाखल केली जाईल, असे तहसीलदार सुरेश बगळे यांनी स्पष्ट केले. महसूल विभागाने अवैध उत्खनन मोहीम हाती घेतल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. विनापरवानगीने गौण खनिज उत्खनन वाहतूक करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
‘ड्रिमलॅण्ड’ला सात कोटींचा दंड
By admin | Updated: October 22, 2016 00:08 IST