शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सात कोटींचा हप्ता, तीन लाखांची भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:13 IST

नैसर्गिक आपत्तींसह हवामान बदल व इतर बाबींमुळे फळपिकांना होणाऱ्या धोक्यापासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे,

शेतकऱ्यांची थट्टा : फळपीक विमा योजनेचा फोलपणा उघडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नैसर्गिक आपत्तींसह हवामान बदल व इतर बाबींमुळे फळपिकांना होणाऱ्या धोक्यापासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे, यासाठी जिल्ह्यात हवामानावर आधारित फळपिक योजना सन २०१६-१७ या कालावधीत राबविण्यात आली. यासाठी १७ हजार १२५ शेतकऱ्यांनी २० हजार ४३५ हेक्टर क्षेत्रासाठी १४३ कोटी ७ लाख रूपयांचा विमा संरक्षित केला व सात कोटी १५ लाख ३५ हजारांच्या विमा हप्ता भरला. प्रत्यक्षात केवळ पाच शेतकऱ्यांना तीन लाख २४ हजारांची भरपाई मिळाल्याने विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची थट्टा शासनाने आरंभली असून केवळ विमा कंपन्यांना लाभ देण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप होत आहे.राष्ट्रीय पीकविमा कार्यक्रमांतर्गत हवामानावर आधारीत फळपीक विमा राज्यात अधिसूचित फळपीकांसाठी राबविण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील संत्रा, केळी व मोसंबी या फळपीकांचा समावेश यायोजनेत करण्यात आला. संत्रा पिकासाठी १२ तालुक्यांतील ७० महसूल मंडळात अधिसूचित करण्यात आले. पाऊस, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वेगाचे वारे व गारपीट यापासून विमायोजनेच्या तरतुदीप्रमाणे फळपीकांसाठी निर्धारित कालावधीत शेतकऱ्यांना विमासंरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे तसेच हवामान घटकावर आधारित फळपीक नुकसानीच्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होता. जिल्ह्यातील १७ हजार १२५ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदविला. प्रत्यक्षात नुकसान भरपाई जाहीर झाल्यानंतर योजनेचा फोलपणा उघड झाला आहे.फळपीकांसाठी पीककर्जाची मर्यादा मंजूर आहे. अशा सर्व कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजना सक्तीची असून बिगरकर्जदार शेतकऱ्यांसाठी ती ऐच्छिक स्वरूपाची होती. फळपीकांसाठी विमा हप्ता दर १२ टक्के असून राज्य व केंद्र शासनाचे प्रत्येकी ५० टक्के अनुदान यायोजनेत आहे. मात्र, योजनेत सहभागी शेतकऱ्यांना विम्याची भरपाई जाहीर झाली असता विमा कंपनीव्दारा शेतकऱ्यांची थट्टाच करण्यात आल्याची बाब स्पष्ट झाली आहे. अमरावती उपविभागात तीन हजार ७३३ शेतकऱ्यांनी चार हजार ३०७ हेक्टरसाठी ३० कोटी १५ लाख ३७ हजारांचा विमा संरक्षित केला. यासाठी एक कोटी ५० लाख ७६ हजारांच्या विमा हप्त्याचा भरणा केला. मात्र, एकाही शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. मोर्शी उपविभागात १० हजार २६३ शेतकऱ्यांनी ११ हजार ९१५ हेक्टरसाठी ८३ कोटी ४३ हजारांचा विमा संरक्षित केला. यासाठी चार कोटी १७ लाख ९६ हजारांचा विमा संरक्षित केला. प्रत्यक्षात पाच शेतकऱ्यांना तीन लाख २४ हजारांची भरपाई देण्यात आली आहे. अचलपूर तालुक्यात तीन हजार १२९ शेतकऱ्यांनी चार हजार २११ हेक्टर हेक्टरसाठी एक कोटी ४७ लाख ४३ हजारांचा विमा संरक्षित केला. योजनेची भरपाई जाहीर झाली असता एकाही शेतकऱ्याला विमा मिळाला नाही.