अमरावती : हा हिंसक प्रकार रोखण्यासाठी फौजदारी करण्याचे ठरविले आहे. स्वाईन फ्लूचा प्रार्दूभाव वाढत असल्याने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. सार्वजनिक आरोग्य अबाधित ठेवताना स्वाईन फ्लू कसा थांबविता येईल, यासाठी महापालिका आयुक्तांनी युद्धस्तरावर उपाययोजना आखल्या आहेत. मोकाट वराह पासून होणारे धोके लक्षात घेताना सार्वजनिक आरोग्य धोक्यात येवू नये, यासाठी वराह पकडण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. येथील वाल्मिकी- आंबेडकर या संस्थेला ना नफा, ना तोटा या तत्वावर मोकाट वराह पकडण्याचा कंत्राट सोपविण्यात आल्याची माहिती सहायक पशु चिकित्सक सचिन बोंद्रे यांनी दिली. काही भागात मोकाट वराह पकडताना पथकासोबत वाद ही नित्याचीच बाब झाली असून नगरसेवक आणि वराह पालकांमध्येही तू,तू- मै, मै होत आहे. मोकाट वराहांचा हैदोस रोखण्यासाठी नागरिकांच्या तक्रारी आहेत. मात्र, अपुऱ्या सोयीसुविधा, तोकडा कर्मचारी वर्ग असताना समस्यांचे निराकरण केले जात आहे. ही कारवाई निरंतर सुरु राहणार असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सचिन बोंद्र यांनी केले आहे. आतापर्यत ३० ठिकाणी वराह पकडण्याची कारवाई करण्यात आली असून ६०० वराह पकडून बाहेर नेण्यात आले आहेत. ही प्रक्रिया कंत्राटदारातर्फे होते.
तक्रारींचे निराकरण
By admin | Updated: February 20, 2015 00:16 IST