सुनावणी : अध्यक्षांनी जाणून घेतल्या समस्याअमरावती : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे विजया रहाटकर यांनी स्वीकारल्यानंतर पाच महिन्यांचा कालावधी पूर्ण होत असताना अन्यायग्रस्त, पीडित महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत शुक्रवारी २५ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.येथील शासकीय विश्रामभवनात अमरावती येथील महिलांची २५ प्रकरणे सुनावणीकरिता महिला व बालकल्याण विभागामार्फत ठेवण्यात आली होती. यात कौटुंबिक वादाची प्रकरणे सर्वाधिक होती. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम, विशाखा समिती, महिला व बालकल्याण समितीच्या ज्योती कौलखडे, पोलीस निरीक्षक निलिमा आरज यांच्यासह पोलीस, महसूल व महिला, बालकल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तक्रारीनुसार संबंधित विभागाला जाब विचारताना आयोगाच्या अध्यक्ष रहाटकर यांनी बऱ्याच प्र्रकरणात तत्काळ न्याय देण्याची भूमिका बजावली. शासकीय महिला कर्मचाऱ्यांच्या प्रकरणांचा त्वरने निपटारा करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला जाईल, ही बाब स्पष्ट केली. अनेक प्रकरणांमध्ये ज्या अधिकाऱ्यांवर आरोप आहेत त्यांचा जबाब नोंदविण्यात आला नसल्याने सुनावणी अशक्य आहे. त्यामुळे अशी प्रकरणे आयोग स्वत: हाताळणार असे रहाटकर यांनी सांगितलेसासूच्या सत्त्वपरीक्षेचा बळी ठरलेली पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी मृत भारती येवतीकर हिच्या आईने विजया रहाटकर यांची भेट घेवून कैफियत मांडली. रहाटकर यांनी हे प्रकरण ‘फास्टट्रॅक’ कोर्टात चालविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासित केले. (प्रतिनिधी)
‘महिला आयोग आपल्या दारी’ अंतर्गत २५ प्रकरणांचा निपटारा
By admin | Updated: July 30, 2016 00:04 IST