शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

सेवाज्येष्ठता यादीत घोळ ?

By admin | Updated: June 27, 2017 00:02 IST

महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलेली कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

महापालिका कर्मचाऱ्यांचा आक्षेप : पदोन्नतीची प्रक्रिया केव्हा?लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलेली कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मर्जीतील कर्मचाऱ्यांकरवी या यादीत जाणूनबुजून घोळ घातल्याचा आक्षेप असून जीएडीच्या कार्यप्रणालीबाबत संताप व्यक्त होत आहे. सन २०१५ नंतर वर्षभराचा ब्रेक घेऊन जीएडीने मागील आठवड्यात महापालिका आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी तयार केली. सन २०१६ मध्ये तांत्रिक कारणास्तव सेवाज्येष्ठता यादी जाहीर करण्यात आली नव्हती. यंदा ती यादी तयार करण्यात आली असली तरी ती सदोष असल्याचा ठपका अनेक कर्मचाऱ्यांनी ठेवला आहे. कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, अधीक्षक अशा संवर्गनिहाय कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेत यादीवर या १७५० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय भवितव्य, पदोन्नती अवलंबून आहे. तथापि अन्य विभागातील मर्जीतील कर्मचाऱ्यांची मदत घेऊन जीएडीने कनिष्ठाला वरिष्ठ आणि वरिष्ठाला कनिष्ठ केल्याचा आक्षेप आहे. अनेकांच्या सेवाज्येष्ठतेचा अनुक्रमांकही जाणूनबुजून बदलविण्यात आला. यासाठी पाणीपुरवठा विभागातील एका वादग्रस्त कर्मचाऱ्यांची मदत घेतल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. जीएडीमध्ये पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असताना त्या ‘बदनाम’ कर्मचाऱ्यांची मदत का घेतली जात आहे, तो कर्मचारी जीएडीतील महत्त्वपूर्ण आणि कर्मचाऱ्यांचे नोकरीविषयक भवितव्य असलेली सेवाज्येष्ठता यादी हाताळत असेल तर अधीक्षकांनी त्याबाबत उपायुक्तांची परवानगी घेतली आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. उपायुक्तांनी घालावे लक्ष जीएडीचा बिघडलेला ताल सुव्यवस्थित करण्याचे आव्हान उपायुक्त प्रशासन महेश देशमुख यांच्यासमोर उभे ठाकले आहे. देशमुखांची प्रतिमा शिस्तप्रिय असल्याने त्यांनी जीएडीला शिस्त लावावी, जीएडीमधील बाहेरच्यांच्या शिरकावाला प्रतिबंध घालावा, कंत्राटीऐवजी महापालिका आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांकडून काम करुन घ्यावी, अशी अपेक्षा आहे. पदोन्नती केव्हा? शेकडो महापालिका कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची प्रतीक्षा आहे. सेवाज्येष्ठता ही केवळ यादीपुरती मर्यादित न राहता प्रशासनाने आकृतीबंध आणि सेवाप्रवेशनियम अंतिम करुन पदोन्नतीची प्रक्रिया करावी, अशी मागणी आता तीव्र होऊ लागली आहे. अनेक कर्मचारी पदोन्नतीविनाच सेवानिवृत्त झाल्याने आपलेही तसेच होणार की काय, अशी भीती महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सतावत आहे. प्रभारींची सर्कस मागील अनेक वर्षांपासून महापालिका कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदाचा प्रभार देऊन त्यांची तात्पुरती बोळवण करण्यात आली आहे. अनेक कनिष्ठ लिपिक अधीक्षकपदावर कार्यरत असून अधीक्षक दर्जाचे कर्मचारी मात्र पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. महापालिका आस्थापनेवरील १७५० कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यात आली. ३ जुलैपर्यंत त्यावर आक्षेप, हरकती नोंदविता येतील. - दुर्गादास मिसाळ, अधीक्षक, सामान्य प्रशासन विभाग