शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट उड्डाणपूल राणांकडून सुरू, खराटेंकडून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 22:44 IST

बांधकाम पूर्ण होण्यास एक वर्षाचा कालावधी अपेक्षित असताना आ. रवी राणा यांनी राजापेठ स्थित अर्धवट उड्डाणपुलाचे शनिवारी सकाळी लोकार्पण केले. ३१ मार्चला हा उड्डाणपूल आपण वाहतुकीसाठी खुला करू, अशी घोषणा त्यांनी तीन दिवसांपूर्वी केली होती.

ठळक मुद्देराजकीय संघर्ष : लोकार्पणानंतर लागलीच झळकले ‘वाहतूक बंद’चे फलक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बांधकाम पूर्ण होण्यास एक वर्षाचा कालावधी अपेक्षित असताना आ. रवी राणा यांनी राजापेठ स्थित अर्धवट उड्डाणपुलाचे शनिवारी सकाळी लोकार्पण केले. ३१ मार्चला हा उड्डाणपूल आपण वाहतुकीसाठी खुला करू, अशी घोषणा त्यांनी तीन दिवसांपूर्वी केली होती. त्यानुसार त्यांनी एका आॅटोरिक्षाचालकाच्या हस्ते फीत कापून हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला. मात्र, राणा यांची पाठ फिरताच तेथे ‘वाहतुकीसाठी बंद अन् काम सुरू’ असा फलक झळकला. वाहतूक पोलिसांपाठोपाठ शिवसेनेनेही उड्डाणपुलावरील वाहतूक बंद केली. त्या पार्श्वभूमीवर राणा यांनी केलेले लोकार्पण ‘फार्स’ ठरले.आ. राणांच्या घोषणेनंतर खा. आनंदराव अडसूळ व आ. सुनील देशमुख यांनी शुक्रवारी उड्डाणपुलाची पाहणी करून महापालिका, कंत्राटदार व अन्य यंत्रणांकडून जोपर्यंत ‘नाहरकत’ मिळणार नाही तोपावेतो, रस्ता वाहतुकीसाठी खुला करणे हे जोखमीचे असेल, असे बजावले होते. राजापेठ स्थित उड्डाणपुलाची एक बाजू किमान महिन्याभरानंतर वाहतुकीसाठी खुली करणे शक्य असल्याचे मत महापालिकेतर्फे व्यक्त करण्यात आले होते. मात्र, ती वस्तुस्थिती नाकारून आ. राणा यांनी शनिवारी सकाळी राजापेठ गाठून आॅटोरिक्षाचालक, स्कूल बसचालक व शहर बसचालकाच्या हस्ते फीत कापून वाहतूक सुरू केली. येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आ. राणांना ते अडवू शकले नाहीत.तत्पूर्वी, राणा यांनी या ठिकाणी हनुमान चालिसाचे वितरण केले. यावेळी युवा स्वाभिमान संघटनेचे तिन्ही नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राणा यांनी यानंतर कार्यकर्त्यांसमवेत राजापेठ पोलीस ठाण्यातील हनुमंताचे दर्शन घेतले.शिवसेनेकडून राणांचा निषेधआ. राणा यांनी उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू केल्याच्या काही वेळानंतरच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी तो मार्ग बंद केला. तेथे राणा यांच्याविरोधात घोषणाबाजी करीत राणांवर प्रसिद्धीलोलुपतेचा आरोप करण्यात आला. राणा सवंग प्रसिद्धीखोर असल्याचे खराटे म्हणाले. यावेळी शहरप्रमुख प्रशांत वानखडे, प्रवीण हरमकर, राहुल माटोळे, विकास शेळके आदींची उपस्थिती होती.अडसूळ विकासविरोधी रावणअर्धवट उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानंतर आ. राणा यांच्या संपर्क कार्यालयातून पाठविण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात खा. आनंदराव अडसूळ यांना विकासविरोधी रावणाची उपमा देण्यात आली आहे. ‘मागील नऊ वर्षाच्या कालावधीत विकासाचे एकही रोपटे न लावणारे विकासविरोधी रावण अडसूळ’ यांचा निषेध करुन राजापेठ उड्डाणपूल जनतेच्या सेवेत सुरू झाल्याची माहिती या पत्रकातून देण्यात आली.शुक्रवारी या उड्डाणपुलाची पाहणी केली. येथे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच वाहतूक सुरु करण्याची घाई न करण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यानंतरही नौटंकी करण्यात आली. जातिवंत आरक्षणचोरांना ‘कोण राम अन् कोण रावण’ हे जनताच दाखवून देईल.- आनंदराव अडसूळ, खासदार