शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट जाळलेले शिक्के जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 22:14 IST

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने जात प्रमाणपत्र वितरित केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी बाबाराव कृष्णराव भवते याची कोठडी मिळविल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी निमखेड बाजार गाठून त्याच्या घरातून अर्धवट जाळलेले शिक्के जप्त केले. दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत २२ बनावट जात प्रमाणपत्रे ताब्यात घेतली आहेत.

ठळक मुद्देबनावट जात प्रमाणपत्र : १७ पर्यंत कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने जात प्रमाणपत्र वितरित केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी बाबाराव कृष्णराव भवते याची कोठडी मिळविल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी निमखेड बाजार गाठून त्याच्या घरातून अर्धवट जाळलेले शिक्के जप्त केले. दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत २२ बनावट जात प्रमाणपत्रे ताब्यात घेतली आहेत.सन २००६ मध्ये धारगड येथील यात्रेदरम्यान जनता दरबारात जात प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. तेथे राखीचे दुकान लावणाºया बाबारावला शासकीय शिक्के व कोरे जात प्रमाणपत्र मिळाले. त्याआधारे तत्कालीन उपविभागीय अधिकाºयांची खोटी स्वाक्षरी करून नागरिकांना त्याने जात प्रमाणपत्र वाटप केले.पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सहायक निरीक्षक प्रीती निचळे, वसंत चव्हाण, अनिल झारेकर यांनी बाबारावला निमखेड बाजार येथे शिक्के जप्त करण्याकरिता नेले होते. कारवाईची भनक लागल्याने अटकेपूर्वीच घरातील चुलीमध्ये ते शिक्के त्याने जाळले होते. त्याचे शिल्लक राहिलेले सांगाडे शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास पोलिसांनी जप्त केले. आरोपीने मेळघाटातील धारणी, चिखलदरा, अचलपूर या परिक्षेत्रात बनावट जात प्रमाणपत्र वाटले. शुक्रवारी रात्री अचलपूर तालुक्यातील चमक येथून आणखी पाच बोगस जात प्रमाणपत्र जप्त करण्यात आले. शनिवारपर्यंत एकूण २२ जात प्रमाणपत्रे पोलिसांना मिळाली.नाव नव्हे, मोबाईल क्रमांक हीच ओळखबाबाराव भवतेने गरजू आदिवासी बांधवांना दीड ते दोन हजार रुपयांत बोगस जात प्रमाणपत्र वाटले. त्यासाठी गावागावांत फेरफटका मारला. पण, स्वत:चे नाव जाहीर करण्याऐवजी मोबाईल क्रमांकच तो कळवत होता. त्यावरूनच आरोपीचा पोलिसांनी शोध लावला.