शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
4
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
5
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
6
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
7
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
8
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
9
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
10
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
11
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
12
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
13
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
14
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
15
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
16
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
17
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
18
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
19
Sonam Raghuvanshi : धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
20
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच

स्त्री-पुरुष बाधितांसाठी स्वतंत्र कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:12 IST

अमरावती : कोविड रुग्णालये, हेल्थ सेंटर, केअर सेंटर आदी ठिकाणी लैंगिक अत्याचार प्रतिबंधक उपाययोजनेत मार्गदर्शक सूचना शासनाने जारी केल्या ...

अमरावती : कोविड रुग्णालये, हेल्थ सेंटर, केअर सेंटर आदी ठिकाणी लैंगिक अत्याचार प्रतिबंधक उपाययोजनेत मार्गदर्शक सूचना शासनाने जारी केल्या आहेत. त्याचे सर्व कोविड रुग्णालये व केंद्रांनी पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी दिले आहेत.

कोविड रुग्णालयात लैंगिक अत्याचाराच्या घटना राज्यात काही ठिकाणी घडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार शासनाने या रुग्णालयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार स्त्री रुग्ण व पुरुष रुग्णांना स्वतंत्र कक्षात दाखल करावे. स्त्री रुग्णाची तपासणी महिला डॉक्टरने करावी व महिला डॉक्टर नसेल तर पुरुष डॉक्टरने स्टाफ नर्सच्या उपस्थितीत करावी. स्त्री रुग्ण कक्षात दोन किंवा जादा महिला रुग्ण ठेवावेत जेणेकरून त्यांचे मनोबल व सुरक्षिततेची भावना वाढेल. स्त्री रुग्ण कक्षात स्त्री सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी. तिथे स्त्री स्वच्छतासेवक व स्त्री परिचर असावी. स्त्री रुग्णांना गावाबाहेरील सेंटर्समध्ये न ठेवता शहरातील मध्यवर्ती ठिकाणी कोविड सेंटर्समध्ये दाखल करण्याचे निर्देश आहेत.

बॉक्स

सर्व ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश

सर्व ठिकाणी सीसीटीव्ही सुस्थितीत चालू असावेत जेणेकरून ये-जा करणाऱ्यांवर देखरेख करता येईल. स्त्री रुग्णांना मोबाईल वापरण्याची परवानगी द्यावी. त्यांच्या नातेवाईकांना दररोज एक-दोन वेळा संपर्क साधण्यास कळवावे. कोणत्याही परिस्थितीत पुरुष डॉक्टरने अधिपरिचारिका किंवा स्त्री परिचर यांच्या उपस्थितीतच स्त्री रुग्णांची तपासणी करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.