शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

मध्यरेल्वेच्या महाप्रबंधकांनी जाणून घेतल्या व्यथा

By admin | Updated: January 15, 2015 22:43 IST

मध्य रेल्वेचे महाप्रबंधक एस. के. सूद यांनी बडनेरा रेल्वेस्थानकाची पाहणी केली. ते गुरूवारी ‘स्पेशल ट्रेन’नी आले होते. त्यांचा हा पाहणी दौरा होता. दरम्यान रेल्वे संबंधातील विविध समस्यांचे निवेदन

बडनेरा : मध्य रेल्वेचे महाप्रबंधक एस. के. सूद यांनी बडनेरा रेल्वेस्थानकाची पाहणी केली. ते गुरूवारी ‘स्पेशल ट्रेन’नी आले होते. त्यांचा हा पाहणी दौरा होता. दरम्यान रेल्वे संबंधातील विविध समस्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले.सकाळी ८ वाजता मध्य रेल्वेचे महाप्रबंधक एस. के. सूद हे रेल्वेच्या विविध विभागाशी संबंधित १३५ अधिकाऱ्यांसह आले होते. १६ डब्याच्या स्पेशल ट्रेनमधून हे अधिकारी आले होते. लोकप्रतिनिधींनी मांडल्या व्यथाएस. के. सूद यांचे स्टेशन मास्तर एम. के. पिल्ले यांनी स्वागत केले. त्यानंतर त्यांनी एक तासपर्यंत बडनेरा रेल्वे स्थानकाची पाहणी केली. रेल्वेस्थानकावरील लॉबी रुमची पाहणी केली. शौचालय, पाण्याचे स्टॅन्ड तपासले. खास करुन स्वच्छतेवर त्यांचा अधिक भर होता. पुढे ज्या ठिकाणी रेल्वेचे चालक मुक्कामी असतात त्या रनिंग रूमची पाहणी केली. त्याठिकाणी जेवण कसे मिळते याची विचारणा चालकाला केली. विश्रामासाठी असणाऱ्या प्रत्येक बाबीची सखोल चौकशी केली. काही बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखिल केल्यात. दरम्यान त्यांच्यासोबत सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी, लोको आॅपरेटींग मॅनेजर अरविंदकुमार, चिफ कमर्शिअल मॅनेजर आर. डी. शर्मा, भुसावळ मध्य रेल्वेचे प्रबंधक महेश गुप्ता, रेल्वे सुरक्षा बलाचे प्रमुख उदय शुक्ला हे प्रमुख अधिकारी होते. दरम्यान बडनेरा रेल्वेस्थानकाशी संबंधित व प्रवाश्यांच्या हिताचे विविध कामांचे निवेदन आमदार रवी राणा, रेल्वे बोर्डाचे सदस्य सुनील भालेराव यांनी दिले. यावेळी नगरसेवक विजय नागपुरे, अजय जयस्वाल, संजय बोबडे, सुकलाल कैथवास, महेश येते यांच्यासह इतरही निवेदनकर्ते उपस्थित होते.दरम्यान रेल्वेचे महाप्रबंधक एस. के. सूद यांनी प्राप्त झालेल्या निवेदनासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन उपस्थित लोकप्रतिनिधी व नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना यावेळी दिले. महाप्रबंधकांचा दौरा असल्यामुळे कधी नव्हे एवढे बडनेरा रेल्वेस्थानक स्वच्छतेने चकाकाल्याचे दिसून आले. मात्र अशाच प्रकारची स्वच्छता रेल्वेस्थानकावर ठेवावी अशी चर्चा महाप्रबंधकांच्या दौऱ्यात प्रवासी व नागरिकांमधून व्यक्त होत होती. (शहर प्रतिनिधी)