अमरावती : ईसीसने स्वातंत्र्यदिनी शहरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली असताना शहरात पोलीस डोळ्यांत तेल घालून तैनात आहेत. या पार्श्वभूमिवर शहराच्या हृदयस्थळी म्हणजे राजकमल चौकात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला रिकामा बेवारस टिफिन आढळून आल्याने काही वेळ प्रचंड खळबळ उडाली. रविवारी सायंकाळी ५.१५ वाजता या बेवारस टिफिनबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली. पोलीस पथक लगेच घटनास्थळी पोहोचले. बीडीडीएस पथकाचे पीआय प्रदीप परदेशी यांच्या नेतृत्त्वातील पथकाने सुरक्षा साहित्यासह काळजीपूर्वक हा डबा उचलून नेहरू मैदानात नेला. तेथे अत्यंत सावधगिरीने तो उघडण्यात आला. मात्र, त्यात जेवणाच्या जिन्नसांव्यतिरिक्त कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही. परंतु काही काळ तणाव निर्माण झाला होता.
राजकमल चौकात बेवारस टिफीनमुळे खळबळ
By admin | Updated: August 14, 2016 23:57 IST