पोलीस ठाण्यात तक्रार : अरुण कॉलनीनजीकची घटनाअमरावती : स्थानिक अरूण कॉलनीनजीकच्या मेघे ले-आऊट परिसरात सोमवारी सकाळी ११ वाजताच्यादरम्यान मानवी सांगाड्याचे अवशेष आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. गाडगेनगर पोलिसांनी सर्व मानवी अवशेष ताब्यात घेऊन याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अरुण कॉलनीजवळील मेघे ले-आऊट येथे अनंत जिरापुरे यांचे घर आहे. एका गुराख्याला सोमवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या घराच्या मागील बाजूस १०० मीटर अंतरावर एक मानवी कवटी व काही अवशेष आढळून आले. ही बाब गुराख्याने जिरापुरे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी घटनेची माहिती गाडगेनगर पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक के.एम. पुंडकर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. व अवशेष जप्त केले. अवशेष तपासणीसाठी ‘फॉरेन्सिक लॅब’कडे पाठविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. परिसरातील एखादी व्यक्ती बेपत्ता आहे का? याचा शोध घेणे सुरु असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
मानवी अवशेष आढळल्याने खळबळ
By admin | Updated: September 22, 2014 23:12 IST