शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

बेचो तुम्हारे जोरू का लहेंगा, देवो हमारा फगवा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 23:10 IST

‘जांगडी, बेचो तुम्हारे जोरू का लहेंगा, देवो हमारा फगवा रे...’, ‘चकर मकर क्या देखो, फगवा दे मुझको...’ अशा पारंपरिक बोलांसह ढोल-बासरीच्या निनादात मेळघाटच्या आसमंतात फगवा गीतांचा जल्लोष आहे. शुक्रवारपासून मेळघाटातील अतिदुर्गम आदिवासी पाड्यांतील आदिवासी युवक-युवतींचे टोळके गीत गात फगव्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. पाच दिवस हा रंगपंचमीचा महोत्सव साजरा होणार आहे.

ठळक मुद्देमेळघाटात फगव्याची धूम : ढोल-बासरीच्या तालावर आदिवासी नृत्य, पाच दिवस पारंपरिक उत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : ‘जांगडी, बेचो तुम्हारे जोरू का लहेंगा, देवो हमारा फगवा रे...’, ‘चकर मकर क्या देखो, फगवा दे मुझको...’ अशा पारंपरिक बोलांसह ढोल-बासरीच्या निनादात मेळघाटच्या आसमंतात फगवा गीतांचा जल्लोष आहे. शुक्रवारपासून मेळघाटातील अतिदुर्गम आदिवासी पाड्यांतील आदिवासी युवक-युवतींचे टोळके गीत गात फगव्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. पाच दिवस हा रंगपंचमीचा महोत्सव साजरा होणार आहे.मेळघाटातील आदिवासी कोरकू आपला सर्वात मोठा होळी हा सण संपूर्ण आठवडाभर साजरा करणार आहेत. प्राचीन परंपरांचे पूजक असलेल्या या आदिवासींचे आपले वेगळे विश्व आहे. होळी या सणासाठी स्थलांतरित झालेले बांधव तीन दिवसांपूर्वीच मेळघाटात परतलेत. गुरुवारी मोठी होळी पेटवल्यानंतर शुक्रवारपासून सुरू झालेल्या फगव्याचा जल्लोष सातपुडा पर्वतरांगांत घुमत आहे. पारंपरिक वेशभूषेत आदिवासी ढोल-बासरीच्या तालावर नाच-गाणे करीत आनंद साजरा करीत आहेत.जांगळीला अडवून फगवा वसुलीमेळघाटातील आदिवासी हा शहरी माणसाला जांगळी म्हणतात. शुक्रवारपासून सुरू झालेल्या फगवा मागण्याच्या पद्धतीत गावातील बाजार किंवा मुख्य मार्गावर मानवी साखळी तयार करून शहरी जांगळीजवळून फगवा मागितला जातो. पाच दिवस फगवा मागितल्यानंतर जमा झालेल्या रकमेतून गावशिवारावर बकऱ्याचे जेवण व सिड्डूचे सेवन होणार आहे. रस्त्यावर दगड-धोंडे, मोठी लाकडे लावून, प्रत्येक वाहन अडवून त्यांच्याकडून आनंदाने हा फगवा मागितला जात आहे.