शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अपक्षांचा बोलबाला

By admin | Updated: July 22, 2014 23:46 IST

जिल्ह्यातील सात पालिकांमध्ये नगराध्यक्ष व नऊ पालिकांमध्ये उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यापूर्वीच अविरोध निवडून आलेल्या चार नगराध्यक्षांच्या निवडीवर औपचारीक

नगराध्यक्ष निवडणूक : सात पैकी चार महिला; दोन ठिकाणी स्थगनादेशअमरावती : जिल्ह्यातील सात पालिकांमध्ये नगराध्यक्ष व नऊ पालिकांमध्ये उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यापूर्वीच अविरोध निवडून आलेल्या चार नगराध्यक्षांच्या निवडीवर औपचारीक शिक्कामोर्तब करण्यात आले. जिल्ह्यात काँग्रेसचे २, जनसंग्रामचे २, प्रहारचा १, भाजपचा १ व एक अपक्ष नगराध्यक्ष विराजमान झाले आहेत. नवनिर्वाचित नगराध्यक्षांमध्ये अंजली अग्रवाल (चांदूररेल्वे- काँग्रेस), सरिता खेरडे (शेंदुरजनाघाट- विदर्भ जनसंग्राम), हनिफाबी मो. शरीफ (अंजनगाव सुर्जी-काँग्रेस), रवींद्र थोरात (वरूड - विदर्भ जनसंग्राम), रंगलाल नंदवंशी (अचलपूर- अपक्ष), अर्चना राऊत (धामणगाव रेल्वे -भाजप) यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील चिखलदरा वगळता इतर पालिकांमध्ये २२ जुलै रोजी निवडणूक घेण्यात आली. मोर्शी आणि दर्यापूर पालिकेत नगराध्यक्ष निवडणुकीवर स्थगनादेश आल्याने इतर सात पालिकांमध्ये नगराध्यक्षांसाठी मतदान घेण्यात आले. त्यापैकी चांदूरबाजार, वरूड, अचलपूर, धामणगाव (रेल्वे) पालिकांमध्ये नगराध्यक्षांची अविरोध निवड झाली आहे. त्यामुळे उर्वरीत तीन चांदूररेल्वे, शेंदुरजना घाट व अंजनगावसुर्जी पालिकांमध्येच नगराध्यक्षपदासाठी प्रत्यक्ष मतदान झाले. मोर्शी आणि दर्यापूर नगरपरिषदेत केवळ उपाध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. दर्यापूर पालिकेतील स्वीकृत सदस्याच्या निधनामुळे रिक्त असलेल्या पदासाठी देखील मंगळवारी निवडणूक घेण्यात आली. धामणगावात अर्चना राऊत नगराध्यक्षधामणगाव (रेल्वे) : धामणगाव नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी आज भाजपाचे नगरसेवक हेमकरण कांकरीया हे १३ मतांनी विजयी झाले तर प्रतीस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवाराला चार मते मिळाली. या पूर्वीच अध्यक्षपदी भाजपाच्या अर्चना राऊत अविरोध निवडून आल्या. यावेळी भाजपाच्या वतीने हेमकरण कांकरीया व कॉंग्रेस तर्फे मोहमद ईब्राहीम शेख मेहमुद यांनी नामांकन दाखल केले़ यावेळी झालेल्या निवडणुकीत कांकरीया यांना १३ मते मिळाली. तर शेख मेहेमूद यांना ४ मते मिळाली. यापूर्वीच भाजपाच्या अर्चना राऊत यांची अविरोध नगराध्यक्षपदी निवड झाली आहे़