कर थकीत ठेवणे भोवले : आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाईअमरावती : येथील विभागीय क्रीडा संकुलातील दुकानदारांनी मालमत्ता कर न भरल्याच्या कारणावरुन शुक्रवारी २७ दुकाने जप्त करण्याची कारवाई करण्यात आलीत. ही कारवाई आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.येथील विभागीय क्रीडा संकुलात एकूण ७४ गाळे आहेत. सन २००९ पासून गाळेधारकांकडे मालमत्ता कर थकीत आहे. थकीत कर भरण्यासाठी प्रशासनाने नियमानुसार नोटीस, कार्यवाहीची प्रक्रिया पूर्ण केली. मात्र, दुकानदारांनी थकीत मालमत्ताकराचा भरणा केला नाही. हे क्रीडासंकुल उत्तर झोन रामपुरी कॅम्प अंतर्गत येत असल्यामुळे कर वसुलीची कारवाई सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. २७ दुकानदारांकडे मालमत्ता कराचे सुमारे १० लाख रुपये थकीत असून ते त्वरीत वसूल करण्यासाठी आयुक्त गुडेवार यांनी संबंधित यंत्रणेला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी २७ दुकानदारांवर जप्तीची कारवाई झाली. ही कारवाई होताच १३ दुकानदारांनी एक लाख २६ हजार ८९८ रुपयांचा भरणा केल्यामुळे जप्तीची कारवाई टळली. ४७ दुकानांबाबत लवकरच निर्णयअमरावती : मात्र, १४ दुकानांवरील जप्ती कायम आहे. मार्चपर्यंत थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी ही मोहीम निरतंर सुरू राहणार असून नागरिकांनी कराचा भरणा करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी केले आहे. कारवाईत कर मूल्यांकन अधिकारी महेश देशमुख, सहायक क्षेत्रीय अधिकारी डी.जी. अलुडे, निरीक्षक विठ्ठल मोहोड, ज्ञानेश्वर चव्हाण, भूषण राठोड, अनिल गोहरे, सावलकर, सुरक्षा रक्षक राजेश जोंधळे व पोलीस पथक उपस्थित होते.
विभागीय क्रीडा संकुलातील २७ दुकाने जप्त
By admin | Updated: February 6, 2016 00:09 IST