शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

सेमाडोहचा मोतीनाला पूल उठलाय जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 01:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : परतवाडा-इंदूर या आंतरराज्यीय महामार्गावरील सेमाडोह नजीकचा मोतीनाला पूल अपघाताला आमंत्रण देणारा ठरला आहे. वर्षभरात २५ वाहने या पुलावरून कोसळले असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे कमालीचे दुर्लक्ष प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करणारे ठरले आहे. मंगळवारी रात्री पुन्हा दुचाकीसह दोन युवक पुलाखाली कोसळल्याने गंभीर जखमी झालेत.सेमाडोह मार्गावरील भूमका बाबा नजिक ...

ठळक मुद्देदोघे गंभीर : वर्षभरात २५ वाहन कोसळली

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : परतवाडा-इंदूर या आंतरराज्यीय महामार्गावरील सेमाडोह नजीकचा मोतीनाला पूल अपघाताला आमंत्रण देणारा ठरला आहे. वर्षभरात २५ वाहने या पुलावरून कोसळले असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे कमालीचे दुर्लक्ष प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करणारे ठरले आहे. मंगळवारी रात्री पुन्हा दुचाकीसह दोन युवक पुलाखाली कोसळल्याने गंभीर जखमी झालेत.सेमाडोह मार्गावरील भूमका बाबा नजिक इंग्रज कालीन मोतीनाला पूल आहे मंगळवारी सुनील बाबु भिलावेकर 36 राजेश चुन्या जावरकर 32 रा सेमाडोह दुचाकीने धारणी वरून सेमाडोह येते येत असताना रात्री दहा वाजताच्या दरम्यान अंधारात पुलावरून दुचाकी २० फूट खोल कोसळल्याने दोघे गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच सेमाडोह येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप भारवे बाबु सेमलर गौरव इंगोले कालू गोहालकर गोड? अजमिरे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका नेऊन पुलाखाली कोसळलेल्या गंभीर जखमी दोघांना आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले.वर्षभर अपघातांची मालिकासेमाडोह नजीकच्या मोतीनाला पुलाला सुरक्षित कठडे नसल्याने वाहने खाली कोसळण्याच्या घटना सतत घडताहेत. गत महिन्यात एकाचा मृत्यू झाला. हा आंतरराज्यीय महामार्ग असताना सतत अपघाताची मालिका घडूनही येथे कुठल्याच प्रकारची व्यवस्था नाही.सदर महामार्ग चौपदरीकरणाचा होणार असल्याचे घोषणा झाली आहे. जुन्या पुलावर तत्काळ सुरक्षेच्या दृष्टीने कठडे लावण्याची मागणी भाजपचे शिवा काकड यांनी केली. यासंदर्भात सा.बां.चे उपविभागीय अभियंता नितीन देशमुख यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.