शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

जयश्रीला पाहून आ.ठाकूर गहिवरल्या

By admin | Updated: July 24, 2016 23:58 IST

तब्बल वर्षभर अंधार कोठडीत काढून मृत्यूच्या दारात पोहोचलेल्या जयश्री दुधे हिची विदारक अवस्था पाहून आ.यशोमती ठाकूर अक्षरश: गहिरवरल्या.

भक्कम पाठबळ : महिला कायद्यातील बदलासाठी प्रयत्नशीलअमरावती : तब्बल वर्षभर अंधार कोठडीत काढून मृत्यूच्या दारात पोहोचलेल्या जयश्री दुधे हिची विदारक अवस्था पाहून आ.यशोमती ठाकूर अक्षरश: गहिरवरल्या. जयश्री दुधे हिची आ.ठाकूर यांनी रविवारी सायंकाळी इर्विन गाठून भेट घेतली. तिला सर्वतोपरीने मदतीचे आश्वासन दिल्यानंतर जयश्रीसह तिच्या कुटुंबियांना भक्कम पाठबळ दिले. जयश्रीवरील अत्याचाराची करुण कहाणी ऐकल्यानंतर महिलाविषयक कायद्यात बदल करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आ. ठाकूर म्हणाल्या. माहुर येथील सासरच्या मंडळीने जयश्रीला वर्षभर अंधाऱ्या कोठडीत डांबून ठेवून तिचा अनन्वित छळ केला.वकील म्हणून उभी राहीनअमरावती : या वृत्ताला 'लोकमत'ने ठळक प्रसिद्धी दिली. वृत्ताची दखल घेत अनेकांनी इर्विन गाठले. जयश्रीवरील अन्यायाला वाचा फुटल्यानंतर आ. यशोमती ठाकूर यांनी संवेदनशील दखल घेत रविवारी इर्विन गाठून जयश्रीची भेट घेतली. यावेळी आ.ठाकूर यांना पाहून जयश्रीच्या डोळे पाणावले. जयश्रीने तिच्या वेदना आ.ठाकूर यांच्यासमोर मांडल्यानंतर त्या गहिवरून आल्यात. जयश्रीची आपबिती ऐकल्यानंतर अत्याचाराची सीमा गाठणाऱ्या सासरच्या मंडळीविरुध्द कठोर कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले. दररोज आमच्यातील एक जण तुला भेटायला येईल, अशी ग्वाही आ.ठाकूर यांनी जयश्रीला दिली. मी तुझ्या पाठीशी आहे, असा धीर दिला. आ.ठाकूर यांनी जयश्रीच्या डोक्यावरून हात फिरून तिला प्रेमाचा दिलासा दिला. तुला लवकरच चालत बाहेर यायचे आहे, अशीच हासत रहा, तुझ्या मुलांची भेट घालून देण्याची जबाबदारी माझी, असा विश्वास आ.ठाकूर यांनी जयश्रीला दिला. त्यानंतर जयश्रीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. यावेळी जि.प. सदस्य चित्रा डहाणे, पंचायत समिती सदस्य मंगेश भगोले, कविता पचलोरे, धिरज श्रीवास, वैभव वानखडे, अनिकेत देशमुख, प्रल्हाद चव्हाण, अल्केश काळबांडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)सर्वपरीने मदतीचे आश्वासनजयश्रीच्या वेदना व तिचे हाल पाहून आ.ठाकूर यांचे दु:ख अनावर झाले. महिलांचा आजही इतका भयानक छळ केला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. जयश्रीला सर्वपरीने मदत करू, कायद्याची लढाई लढू, आवश्यक पडल्यास जयश्रीच्या पाठीशी वकील म्हणूनसुध्दा उभे राहू, अशी ग्वाही आ.यशोमती ठाकूर यांनी जयश्रीला सांत्वन भेटीदरम्यान दिली. औचित्याचा मुद्दा मांडणार जयश्रीची भेट घेतल्यानंतर आ.ठाकुर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महिलाविषयक कठोर कायदा असतानाही महिलांवर अन्याय केल्या जात असल्याची खंत आ.ठाकूर यांनी व्यक्त केली. जयश्रीच्या निमित्याने पावसाळी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा मांडून २००४ व २००५ च्या कायद्यात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.