असाईनमेंट पान ३
अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागले होते. मात्र, या लॉकडाऊनमध्ये एकटे राहणाऱ्या वृद्धांची चांगलीच फजिती झाली. एकाही पोलीस ठाण्यात अशा वृद्धांची नोंद नसून कुणीही आमच्याकडे लक्ष देत नाही, अशी खंत त्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. इतकेच नव्हे तर पावसाने घरही पडले असून, दोन वेळच्या जेवणाचेही हाल होत असल्याची वृद्धांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बांधव अहोरात्र रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत होते. शहरात कोतवाली, राजापेठ, गाडगेनगर, फ्रेजरपुरा, नागपुरी गेट, खोलापुरी गेट, वलगाव, भातकुली, बडनेरा, नांदगाव पेठ ही पोलीस ठाणी आहेत. या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही अनेक वृद्ध निराधार, एकटे राहतात. मात्र, अशा कुठल्याही वृद्धांची नोंद पोलीस ठाण्यात नसल्याची माहिती आहे. त्यामुळे अशा वृद्धांना कोरोना संकटकाळात विविध संकटांना तोंड द्यावे लागले. इतकेच नव्हे, तर औषधी आणून देण्यासही कुणी तयार होत नसल्याने, त्यांचे हाल झाल्याचे त्यांनी सांगितले. शहर परिसरातील दोन वृद्धांच्या व्यथा ऐकून मन हेलावून गेले. त्यांच्या घराची पडझड झाली असून, अद्यापही कुणी मदतीला धावलेले नाही.
एकाही पोलीस ठाण्यात नोंद नाही
शहर कोतवाली पोलीस ठाणे
कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक वृद्ध एकाकी राहतात. मात्र, अशा कुठल्याही वृद्धाची नोंद पोलीस ठाण्यात नसल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिसांनी याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
राजापेठ पोलीस ठाणे
राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्तीत जास्त शहरी भाग येत असल्याने, एकटे राहणाऱ्या वृद्धांची नोंद घेताना कमालीची अडचण होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आता नोंदी घेणे सुरू असल्याचे सांगण्यात आले.
फ्रेजरपुरा पोलीस ठाणे
फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत सुमारे १० हजारांवर नागरिक वास्तव्यास आहेत. मात्र, वृद्ध नागरिक किती आहेत, याची पोलिसात नोंद नाही. मात्र, वृद्धांचा मदतीसाठी फोन आल्यास तत्काळ पोलिसांकडून त्यांना मदत दिली जाते.
बॉक्स
औषधी आणण्याचीही सोय नाही
शहरात एकटे राहणाऱ्या वृद्धांना औषधी आणण्यासाठीही कुणी भेटत नाही. अनेकांच्या घराची दुर्दशा झाली असून, कुणीही याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकाकी वृद्धांना यातना सोसाव्या लागत असल्याचे दिसून येत आहे.
कोट
आयुष्यात एकदाही पोलिसांकडून विचारणा नाही
माझे वय ७५ वर्षे आहे. मागील १० वर्षांपासून मी न् पती दोघेच आहोत. निराधार योजनेचे ६०० रुपये मिळतात, त्यावर घर चालते. घरात लाइन नाही. कोरोनात मोठे हाल झाले, पण एकदाही कुणी विचारायला आले नाही. आजही तीच परिस्थिती कायम आहे.
वेणुबाई खंडारे, अकोली रोड
फोटो पी २८ लिंगे
कोट २
माझे वय ७० वर्षे आहे. १५ वर्षांपासून आम्ही पती-पत्नी दोघेच राहतो. कोरोनात आमचे मोठे हाल झाले. कुणीही साधे विचारायलाही आले नाही. औषध आणण्यासाठीही पैसे नव्हते. तरीही मी जिवंत आहे. अजून हार मानलेली नाही. पोलीसही कधी विचारणा करण्यास आलेले नाहीत. संकटाशी दोन हात आजही करते आहे.
सुमन लिंगे, केडियानगर
शहरातील पोलीस ठाणे - १०
पोलीस अधिकारी - ११०
पोलीस - १९००
शहरात ६० वर्षांवरील अधिक लोकसंख्या -