शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासक्रम वेगळा गुणपत्रिकेत दुसरेच विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:13 IST

विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमानुसार पेपर सोडविला. मात्र, गुणपत्रिका वेगळ्याच विषयांची हाती पडली. असे असले तरीही विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची धक्कादायक बाब बुधवारी निदर्शनास आली. त्यामुळे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील घोळ संपता संपेना, हे विदारक चित्र आहे.

ठळक मुद्देविद्यापीठाचा घोळ : एम.ए. राज्यशास्त्र भाग-२ सेमिस्टर ४ पेपरमधील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमानुसार पेपर सोडविला. मात्र, गुणपत्रिका वेगळ्याच विषयांची हाती पडली. असे असले तरीही विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची धक्कादायक बाब बुधवारी निदर्शनास आली. त्यामुळे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील घोळ संपता संपेना, हे विदारक चित्र आहे.विद्यापीठात गत तीन वर्षांपासून परीक्षा आणि निकाल सुरळीत लागले असतील, असे क्वचितच घडले आहे. असाच धक्कादायक प्रकार बुधवारी समोर आला. अमरावती येथील श्री. शिवाजी कला, वाणिज्य महाविद्यालयातील एम.ए. भाग २ (राज्यशास्त्र) अभ्यासक्रमाचा विद्यार्थी प्रसेनजित बाबूराव इंगोले याने उन्हाळी २०१९ परीक्षेत सेमिस्टर ४ ची परीक्षा दिली. त्याने पदव्युत्तर राज्यशास्त्र अभ्यासक्रमाचे वेस्टर्न पॉलिटिकल थॉट अ‍ॅन्ड थिअरी, रिसर्च मेथडॉलॉजी, डिप्लोमसी अ‍ॅन्ड इंडियन फॉरेन पॉलिसी, इंटरनॅशनल लॉ अ‍ॅन्ड इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन, असे चार पेपर दिले. मात्र, डिप्लोमसी अ‍ॅन्ड इंडियन फॉरेन पॉलिसी, इंटरनॅशनल लॉ अ‍ॅन्ड इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन या दोन विषयांऐवजी पॉलिटिकल सोशालॉजी व पॉलिटिकल अथ्रॉपॉलाजी हे दोन विषय गुणपत्रिकेवर नमूद करून त्यांचे गुण देण्यात आले आहे. जे विषय अभ्यासक्रमात घेतले नाही, त्याचे गुण नमूद करून चक्क उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका हाती पडल्याने सदर विद्यार्थी गोंधळून गेला आहे. अशाच प्रकार श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, तक्षशीला महाविद्यालय, शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयातील पदव्युत्तर राज्यशास्त्र अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसोबत झाल्याची माहिती मिळाली आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागात सर्वाधिक मनुष्यबळ उपलब्ध असुनही अचूक निकाल कधी लागणार, असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.चूक परीक्षा विभागाची, हेलपाटे विद्यार्थ्यांनाएम.ए. राज्यशास्त्र भाग २ सेमिस्टर ४ पेपर वेगळ्याच विषयाचे सोडविले आणि उत्तरपत्रिका वेगळ्याच विषयाची मिळाल्याबाबत विद्यार्थ्यांनी बुधवारी विद्यापीठ गाठले. परीक्षा व मूल्यांकन विभागात प्रसेनजित इंगोले या विद्यार्थ्याने कैफियत मांडली. मात्र, गुणपत्रिकेवरील चूक दुरूस्त करून मिळेल. त्याकरिता २० दिवसांचा अवधी लागेल, असे उत्तर देत विद्यार्थ्यांची बोळवण करण्यात आली. त्यामुळे विद्यापीठाचा कारभार कसा चालतो, हे स्पष्ट होते.